Golden Dome : अमेरिका अंतराळात बसवणार क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा; 500 अब्ज डॉलर खर्च, रशिया-चीनने दर्शविला विरोध

Golden Dome : ट्रम्प यांनी केले क्षेपणास्त्र संरक्षण योजनेचे अनावरण; अण्वस्त्रांपासून संरक्षणावर भर, AI, सेन्सर आणि इंटरसेप्टर्सचा वापर
America's Golden Dome project
America's Golden Dome projectPudhari
Published on
Updated on

Donald Trump said America to deploy golden dome missile defence system in space

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी 'Golden Dome' नावाच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेच्या नव्या तपशीलांची माहिती दिली. ही संरक्षण यंत्रणा अमेरिकेकडून अंतराळात बसवली जाणार आहे. याचा अंदाजे एकूण खर्च सुमारे 500 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकतो. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ही अंतराळातील पहिली शस्त्र प्रणाली असेल आणि ती सुमारे तीन वर्षांत त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी कार्यान्वित होईल.

ट्रम्प म्हणाले की, त्यांनी जानेवारीत व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर काही दिवसांत ही योजना जाहीर केली होती आणि आता त्या यंत्रणेची संरचना अधिकृतपणे ठरवली आहे. हे 'पुढच्या पिढीच्या' हवाई धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बनवले जात आहे.

"निवडणुकीच्या प्रचारात मी अमेरिकन जनतेला वचन दिले होते की मी एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उभारणार. आज मी आनंदाने सांगतो की, आम्ही या आधुनिक प्रणालीसाठी अधिकृतपणे संरचना निवडली आहे," असे ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये बोलताना म्हणाले.

Golden Dome प्रणाली काय आहे?

Golden Dome ही एक भू-आधारित आणि अंतराळ-आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असेल जी क्षेपणास्त्रांचे शोध, मागोवा घेणे आणि त्यांना उड्डाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नष्ट करणे यामध्ये सक्षम असेल — अगदी प्रक्षेपणापूर्वीही. ट्रम्प म्हणाले की, ही प्रणाली जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून किंवा अंतराळातूनही क्षेपणास्त्रे डागले गेले तरी ते थांबवू शकेल.

Golden Dome मध्ये जमीन, समुद्र आणि अंतराळ यामध्ये कार्यरत होणाऱ्या अगदी आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जाईल, ज्यात अंतराळातील सेन्सर्स आणि इंटरसेप्टर्स यांचा समावेश असेल.

पेंटॅगॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी सांगितले की ही प्रणाली विद्यमान संरक्षण यंत्रणेशी जोडली जाईल आणि अमेरिका कोणत्याही प्रकारच्या क्षेपणास्त्र वा ड्रोन हल्ल्यापासून सुरक्षित राहील, मग ते पारंपरिक असोत वा अण्वस्त्रयुक्त.

America's Golden Dome project
Pakistan loan request 2025: IMF च्या मदतीनंतरही पाकिस्तान असमाधानी! आणखी 4.9 अब्ज डॉलर कर्जासाठी चीन, सौदी, आशिया बँकेसमोर पसरले हात

खर्च किती येईल?

Congressional Budget Office च्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा खर्च 500 अब्ज डॉलर्सहून अधिक होऊ शकतो. मात्र ट्रम्प यांनी सध्या 25 अब्ज डॉलर्सचा प्रारंभिक निधी जाहीर केला आहे. पुढे हा प्रकल्प 175 अब्ज डॉलर्स इतक्या खर्चात पूर्ण होऊ शकतो, असे ते म्हणाले.

प्रकल्प केव्हा पूर्ण होईल?

ट्रम्प यांनी सांगितले की, ही प्रणाली तीन वर्षांत कार्यान्वित केली जाईल – म्हणजे त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटीपर्यंत. तथापि, Forbes ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा खर्च पुढील 20 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केला जाईल.

प्रकल्पाचे नेतृत्व कोण करेल?

या प्रकल्पाचे नेतृत्व US Space Force General माइकल गुएटलाईन यांच्याकडे असेल. ते चार-स्टार जनरल आहेत आणि त्यांनी Air Force मध्ये 30 वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर 2021 मध्ये Space Force मध्ये प्रवेश केला. ते क्षेपणास्त्र संरक्षण आणि अंतराळ प्रणालींचे तज्ज्ञ मानले जातात.

कोणते देश Golden Dome अंतर्गत येतील?

ही प्रणाली अमेरिका कोणत्याही प्रकारच्या क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केली जात आहे. मात्र ट्रम्प यांनी सांगितले की, कॅनडानेही यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, कारण "त्यांनाही सुरक्षा हवी आहे."

America's Golden Dome project
China speed up Dam in Pakistan: पाकिस्तानातील मोहमंद धरणाच्या बांधकामाला चीनने दिली गती, 700 फूट उंचीचे जगातील पाचव्या क्रमांकाचे धरण

Golden Dome नावामागील कल्पना

Golden Dome हे नाव इस्रायलच्या Iron Dome या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीवरून प्रेरित आहे, जी 2011 पासून शॉर्ट-रेंज रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा यशस्वीपणे पाडाव करते. अमेरिकेला लांब पल्ल्याची, आण्विक क्षेपणास्त्रे आणि हायपरसॉनिक हत्यारे यांच्यापासून संरक्षण हवे आहे.

अंमलबजावणीतील अडचणी

  • याबाबतचे तंत्रज्ञान अत्यंत महागडे व अविकसित आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसारख्या लक्ष्यांना रोखणे आजही खूप कठीण आहे.

  • अवकाशातील सेन्सर आणि इंटरसेप्टर चालू ठेवण्यासाठी खूप ऊर्जा, समन्वय आणि अचूकता लागते.

या योजनेचा विरोध कोण करत आहे?

रशिया आणि चीन यांनी यावर्षीच्या सुरुवातीलाच 'Golden Dome' संकल्पनेला विरोध दर्शवला. त्यांनी सांगितले की यामुळे अंतराळ 'युद्धभूमी' बनण्याचा धोका निर्माण होतो.

"ही योजना अंतराळातील लढायांसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यात लक्षणीय वाढ करणारी आहे," असे क्रेमलिन कडून दोन्ही देशांच्या चर्चेनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेची ही कृती 1958 च्या अंतराळ कराराच्या (Outer Space Treaty) विरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्या करारात अंतराळाचा शांततेसाठी वापर करण्याची अट आहे.

America's Golden Dome project
White Hydrogen: वैज्ञानिकांनी शोधला 'व्हाईट हायड्रोजन'चा नैसर्गिक साठा; 1,70,000 वर्षे उर्जा पुरवठा शक्य

भविष्यातील धोके

अंतराळात इंटरसेप्टर व सेन्सर्स बसवणे म्हणजे अंतराळाच्या लष्करीकरणाची अधिकृत सुरुवात असेल. यामुळे अंतराळातील स्पर्धा वाढेल आणि रशिया-चीनसारखे देशही अशाच योजना आणू शकतात. अंतराळातील युद्धाची शक्यता वाढेल.

ही प्रणाली डिजिटल असल्यामुळे हॅकिंग किंवा डाटा ब्रेकमुळे अपयशी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सायबर हल्ले होऊ शकतात.

विशेषतः हायपरसॉनिक शस्त्रास्त्र व अण्वस्त्र वाहक क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा असल्याने भविष्यातील शस्त्रस्पर्धा वाढीस लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news