पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनच्या मध्यवर्ती भागात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४१ नागरिक ठार झाले असून, १८० जण जखमी झाले आहेत. 22 फेब्रुवारी २०२२ राेजी युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैन्याने केलेला हा सर्वात माेठा प्राणघातक हल्ला आहे, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली आहे.
युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, रशियन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या मध्यवर्ती भागातील पोल्टावा प्रदेशातील दोन शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ४१ नागरिक ठार झाले आहेत. तर १८० जखमी झाले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैन्याने केलेला हा स्ट्राइक सर्वात प्राणघातक हल्ला आहे. इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्सची एक इमारत अंशतः नष्ट झाली आहे. अनेक लाेक ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. देशातील आपत्तकालीन यंत्रणांचे बचाव कार्य सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.