Rules For Indians : मोठ्या आवाजात बोलू नका! परदेशी हॉटेलचे भारतीयांसाठी खास नियम; उद्योगपती हर्ष गोएंकांनी शेअर केला फोटो

स्वित्झर्लंडच्या हॉटेलमध्ये भारतीयांसाठी खास सूचना; हर्ष गोयंका यांनी शेअर केला फोटो
Rules For Indians
Rules For Indians : मोठ्या आवाजात बोलू नका! परदेशी हॉटेलचे भारतीयांसाठी खास नियम; वाचून येईल रागfile photo
Published on
Updated on

rules specifically for indians in swiss hotel shared by industrialist harsh goenka

पुढारी ऑनलाईन :

सोशल मीडियावर अलीकडेच ‘सिव्हिक सेन्स’ (नागरिक शिष्टाचार) या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यावेळी कारण ठरले आहे स्वित्झर्लंडमधील एका हॉटेलचे नियम, जे विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Rules For Indians
Iran war impact: गरज राष्ट्रभान जागृतीची

उद्योगपती Harsh Goenka यांनी या नियमांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये भारतीयांनी हळू आवाजात बोलावे, जेवणासंदर्भातील नियम पाळावेत आणि इतर पाहुण्यांचा विचार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

गोयंका यांनी लिहिले, “मी स्वित्झर्लंडमधील एका हॉटेलमध्ये भारतीयांसाठी तयार केलेली नियमावली पाहिली होती. ती पाहून मला आश्चर्य वाटले.”

Rules For Indians
Oil Price Rise | भारताला दुहेरी तेलफटका

त्यांनी पुढे म्हटले की, “आज रेस्टॉरंटमध्ये गरबा खेळणे, विमानतळांवर मोठ्याने बोलणे आणि विमानातील केबिनला पिकनिक स्पॉट बनवल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. दावोसमध्ये एका भारतीय व्यावसायिकाने क्लबमध्ये पंजाबी गाणी इतक्या मोठ्या आवाजात लावली की संपूर्ण शहराला ती ऐकू जात होती.”

जपानचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, “जपानने आपल्या नम्रतेमुळे, शिस्तीमुळे आणि नागरिक शिष्टाचारामुळे जगभरात सन्मान मिळवला आहे. भारताला जागतिक महासत्ता बनायचे असेल, तर भारतीयांची ओळख उत्कृष्टता, इतरांविषयी आदर आणि जबाबदार वर्तन यासाठी झाली पाहिजे. आपला सिव्हिक सेन्स सुधारण्याची गरज आहे.”

भारतीयांसाठी हॉटेलचे नियम

हे नियम Arc-en-Ciel Hotel येथील असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये जेवणापासून ते वागणुकीपर्यंत अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

जेवणासंदर्भातील नियम

🔹 नाश्त्याचा बुफे सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत उपलब्ध असतो. सर्व खाद्यपदार्थ ताजे बनवले जातात आणि स्थानिक उत्पादकांकडून आणले जातात. कृपया बुफेमधील अन्न सोबत घेऊन जाऊ नका. लंच पॅक हवा असल्यास कर्मचाऱ्यांकडे स्वतंत्र ऑर्डर द्यावी लागेल आणि त्यासाठी शुल्क आकारले जाईल.

🔹 इतर पाहुण्यांनाही बुफेचा आनंद घेता यावा यासाठी केवळ उपलब्ध करून दिलेली कटलरीच वापरावी.

🔹 हॉटेलचे रेस्टॉरंट दुपारचे व रात्रीचे जेवणासाठी खुले असते. शाकाहारी पदार्थांसह विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकच डिश शेअर केल्यास प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी सेवा व प्लेट शुल्क CHF 5 आणि पेयासाठी CHF 1 अतिरिक्त आकारले जाईल.

शांतता आणि वर्तनासंबंधी नियम

🔹 हॉटेलमध्ये जगभरातील इतर पाहुणेही मुक्कामाला असतात. त्यांनाही शांतता आणि विश्रांती हवी असते. त्यामुळे कॉरिडॉरमध्ये शांत राहा आणि बाल्कनीत मोठ्याने बोलू नका.

🔹 रिसेप्शन सकाळी ७:०० ते रात्री १०:३० पर्यंत खुले असते. रात्रीच्या वेळी केवळ आपत्कालीन कॉल स्वीकारले जातील. रूम सर्व्हिस सकाळी ७:३० ते रात्री १०:०० पर्यंतच उपलब्ध असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news