Robert Fico: स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर प्राणघातक हल्ला, PM मोदींनी व्यक्त केला तीव्र शब्दात निषेध

Robert Fico
Robert Fico
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फायको यांच्यावर बुधवार (दि.१६ मे) गोळीबार झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही या हल्‍ल्‍याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित हा 71 वर्षीय लेखक असल्याची माहिती समोर आल्याचे स्लोव्हाकियाच्या गृहमंत्र्यांनी बुधवारी (दि.१५) माध्यमांना सांगितले.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान फिको बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) हँडलोवा येथे झालेल्या गोळीबारात जखमी झाले. त्याच्यावर सध्या बांस्का बिस्ट्रिका शहरात उपचार सुरू आहेत.  हल्‍लेखाेराला घटनास्थळी अटक करण्यात आली. अमेरिकेनेही या हल्ल्याचा निषेध केला आणि राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी फिकोला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

PM मोदींनी व्यक्त केला तीव्र शब्दात निषेध

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी या भ्याड हल्ला आणि घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच पंतप्रधान फिको लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. भारत स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या जनतेच्या पाठीशी उभा आहे."

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news