Vladimir Putin: "मोदींवर दबाव आणणं अशक्य" भारत-अमेरिका मैत्रीवर पुतिन यांनी एका वाक्यात सगळंच स्पष्ट केलं

भारताचे अमेरिकेसोबत वाढते संबंध रशियासाठी चिंतेचा किंवा तणावाचा विषय नसल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले.
Vladimir Putin
Vladimir PutinFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारताचे अमेरिकेसोबत वाढते संबंध रशियासाठी चिंतेचा किंवा तणावाचा विषय नसल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले. तसेच भारत आणि चीनमधील नाजूक संबंधांमध्ये रशिया कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगत भारत आमचा विश्वासू आणि खात्रीशीर भागीदार आहे, असा गौरवोद्गार पुतीन यांनी काढले.

'पंतप्रधान मोदींवर दबाव आणणे अशक्य'

सेंट पीटर्सबर्ग येथील वार्षिक आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत पत्रकारांशी बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी म्हणाले की, "जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दबाव आणणे अशक्य आहे, हे आता सर्वांना समजले आहे. भारताच्या वेगवान आर्थिक वाढीचे कौतुक करत, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार लवकरच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल," असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला.

Vladimir Putin
Donald Trump: "भारताकडून आता अमेरिका भरपूर पैसे कमावतेय"; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

पुतिन म्हणाले की, मध्यपूर्वेतील संघर्ष लवकरात लवकर संपावा अशी रशियाची इच्छा आहे. इराणशी संबंधित तणाव आणि जागतिक सागरी वाहतुकीच्या प्रमुख मार्गांमधील व्यत्ययांमुळे वाढलेल्या ऊर्जेच्या किमतींचा मॉस्कोला फायदा होतो, यांसारख्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. पुतिन म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या संकटाच्या काळात इराणी जनतेने एकजूट आणि कणखरपणाचे प्रदर्शन केले आहे; तसेच, भविष्यातील कोणत्याही तोडग्यामध्ये त्यांच्या हिताचा विचार करणे अत्यावश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. "इराणी जनतेच्या हिताचा विचार केला गेला पाहिजे, हे त्यांनी सिद्ध केले आहे यात शंकाच नाही. त्यांनी आपल्यातील एकोपा आणि संघर्ष करण्याची जिद्द दाखवून दिली आहे. आम्ही आमच्या इराणी मित्रांशी सतत संपर्कात आहोत आणि यातून नक्कीच एखादा सकारात्मक परिणाम निष्पन्न होईल, अशी आम्हाला आशा आहे," असे ते म्हणाले.

भारत-चीन संबंधात रशिया हस्तक्षेप करणार नाही: व्लादिमीर पुतिन

पुतिन यांनी स्पष्ट केले आहे की, भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये रशिया कोणताही हस्तक्षेप करणार नाही. नवी दिल्ली आणि बीजिंग हे दोन्ही देश आपापसातील जुने सीमावाद शांततापूर्ण आणि सलोख्याच्या मार्गाने सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत, असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला. पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या दोन्ही नेत्यांचे कौतुक करत, ते सीमाप्रश्न सोडवण्यास सक्षम असल्याचे सांगितले.

पाश्चिमात्य देशांवर निशाणा

भारत आणि रशियाच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या आणि भारतावर दबाव आणू पाहणाऱ्या अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचे प्रयत्न पूर्णपणे फोल आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना हानी पोहोचवणारे असल्याचे पुतिन म्हणाले. रशिया युक्रेन संकट सोडवण्यासाठी चर्चेस तयार आहे, मात्र युरोपीय युनियनने युक्रेनला शस्त्रे पुरवण्याऐवजी तडजोड करण्यासाठी त्यांचे मन वळवावे. तसेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या अध्यक्षपदाच्या वैधतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भारताचे अमेरिकेसोबत वाढते संबंध रशियासाठी चिंतेचा किंवा तणावाचा विषय नसल्याचे पुतिन यांनी केले स्पष्ट. एका पत्रकाराने "भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध रशियासोबत तणाव निर्माण करत आहेत," असा प्रश्न विचारला. यावर पुतिन यांनी हा विचार अत्यंत विचित्र असल्याचे म्हटले. "भारत हा एक महान देश आहे," अशा शब्दांत पुतिन यांनी भारताचा गौरव केला. ते म्हणाले, "भारताचे जगातील सर्वच देशांशी चांगले संबंध विकसित होत असल्याचा रशियाला आनंदच आहे."

Vladimir Putin
Colonial Mindset | वसाहतवादी मानसिकतेचे दर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news