Prince William : धक्‍कादायक..!ब्रिटनचे राजपुत्र विल्यम यांच्या ‘ॲनमर हॉल’ निवासस्थानी घरफोडीचा प्रयत्न

पोलिसांनी दोन संशयितांना केली अटक
Prince William Anmer Hall Break in
File Photo
Published on: 
Updated on: 

Prince William Anmer Hall Break in : ब्रिटनचे राजपुत्र विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांच्या ‘ॲनमर हॉल’ या निवासस्थानी घरफोडीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ब्रिटिश राजघराण्याच्या सँड्रींगहॅम इस्टेटमधील या आलिशान बंगल्यात घुसखोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

परिसरात मोठी शोधमोहीम

नॉरफोक पोलिसांनी मंगळवारी या घटनेची अधिकृत माहिती दिली. सोमवारी सायंकाळी या मालमत्तेजवळ काहीतरी ‘संशयास्पद हालचाली’ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी श्वानपथक, ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. या मोहिमेअंती घरफोडी आणि बेकायदेशीर प्रवेशाच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

Prince William Anmer Hall Break in
Prince Harry Latest News | प्रिन्स हॅरी आणि मेगन पुन्हा ब्रिटनला परतणार

दोन्ही संशयित सध्या पोलीस कोठडीत

ही घटना घडली तेव्हा बंगल्यात कोणीही नव्हते. प्रिन्स विल्यम, केट आणि त्यांची तिन्ही मुले त्यावेळी तेथे उपस्थित नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित सध्या पोलीस कोठडीत आहेत. या घटनेत नेमके काय चोरीला गेले आहे किंवा मालमत्तेचे काही नुकसान झाले आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

Prince William Anmer Hall Break in
Prince Andrew : अँड्र्यू यांचं The Epstein File कनेक्शन! गेलं 'प्रिन्स' टायटल; राजवाडाही सोडावा लागणार, मस्क अन् ट्रम्प यांचही आलं होतं नाव

‘केन्सिंग्टन पॅलेस’ने सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करण्यास नकार

ब्रिटनमधील प्रसिद्ध दैनिक ‘द सन’ने या घरफोडीचे वृत्त सर्वप्रथम दिले होते. सोमवारी रात्री काही बुरखाधारी व्यक्तींनी ॲनमर हॉलमध्ये प्रवेश केल्याचे या वृत्तात म्हटले होते. दरम्यान, प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्या जनसंपर्काचे काम पाहणाऱ्या ‘केन्सिंग्टन पॅलेस’ने सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, प्रिन्स विल्यम मंगळवारी लंडनमधील '१० डाऊनिंग स्ट्रीट' येथे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्यासोबतच्या बैठकीत व्यस्त होते.

'ॲनमर हॉल' विल्यम आणि केट यांना मिळाला होता लग्नाची भेट

लंडनच्या उत्तरेस सुमारे १७१ किलोमीटर अंतरावर असलेला १० शयनकक्षांचा हा 'ॲनमर हॉल' बंगला दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी विल्यम आणि केट यांना लग्नाची भेट म्हणून दिला होता. हे जोडपे सुट्ट्यांमध्ये या घराचा वापर करते. लंडनच्या पश्चिमेकडील विंडसर येथील 'फॉरेस्ट लॉज' हे त्यांचे मुख्य निवासस्थान असून, त्याला ते आपले 'कायमस्वरूपी घर' मानतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.