Pok Violence Imran Khan: पाक व्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात... इम्रान खान समर्थकांची देशभर आंदोलने; मुनीर-शहबाजांवर दुहेरी अटॅक

Pok Violence Imran Khan
Pok Violence Imran Khanpudhari
Published on
Updated on

Pok Violence Imran Khan: पाकिस्तान सध्याच्या घडीला अडचणींचा सामना करत आहे. एका बाजूला पाक व्याप्त काश्मीरमध्ये निवडणुकीवेळी हिंसाचार झाला आहे. तिथं उठावाचे वातावरण असून दुसरीकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने आजपासून देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे.

Pok Violence Imran Khan
Pakistan Bans Al Jazeera : चोराच्या उलट्या बोंबा..! PoK मधील क्रूर दडपशाहीच्या वृत्तांनंतर पाकिस्तानकडून 'अल जझीरा'वर बंदी

या दोन्ही मोर्चांवर आता पाक सेना प्रमुख मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांची गोची झाली आहे. एका बाजूला पाक व्याप्त काश्मीर पेटलं आहे दुसऱ्या बाजूला पीटीआयने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जगाला देशातील गंभीर परिस्थिती दिसू नये म्हणून पाकिस्तान सरकारने परदेशी पत्रकारांवर कडक निर्बंध घातले आहे. आता कोणताही परदेशी पत्रकार इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या बाहेर रिपोर्टिंग करायला जायचं असेल तर सरकारची खास परवानगी घ्यावी लागणार आहे.

Pok Violence Imran Khan
Pakistan Political Controversy: पाकिस्तान फुटणार? नवीन प्रांतांच्या मागणीवरून मुनीर-शाहबाज आमने-सामने, राजकीय वाद उफाळला

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं परदेशी मीडिया फॅसिलिटेशन गाईडलाईन्स २०२६ या नावानं एक नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार परदेशी पत्रकार आता मोठ्या शहरांच्या बाहेर जाऊन बातमी, डॉक्युमेंट्री, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया कंटेट करण्यापूर्वी मंत्रालयाच्या एक्सटर्नल पब्लिसिटी विंगकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

एबाटाबाद आणि मरी जायला पत्रकारांना थोडी सूट दिली आहे. तिथं जायला तीन दिवसात एनओसी मिळू शकते. हे नियम फक्त पत्रकारांन नाही तर प्रोडक्शन टीम, मीजिया कंपन्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत.

Pok Violence Imran Khan
Pakistan New Batting Coach : पाकिस्‍तानी फलंदाजांची 'हाराकिरी'; मालिका सुरू असतानाच नव्या प्रशिक्षकाची घोषणा

परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारांना देखील पाकिस्तानी दूतावासाद्वारे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंत्रालयाने ही नोंदणी फक्त ओळख पटवण्यासाठी आहे. यामुळे कोणालाही सरकारी दर्जा मिळणार नाही. रजिस्ट्रेशन कार्ड सात दिवसात मिळणार आहेत. प्रेस एक्रेडिएशन कार्ड तयार होण्यास चार ते सहा आठड्यांचा वेळ लागू शकतो.

या सर्व बंधनांमध्ये इम्रान खानची पार्टी पीटीआयने मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाच्या संसदीय बैठकीत ५ ऑगस्ट रोजी पूर्ण पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

Pok Violence Imran Khan
Pakistan Suicide Attack | पाकिस्तानात बंडखोरांच्या हल्ल्यात पंधरा जण ठार

५ ऑगस्ट २०२३ मध्येच इम्रान खान यांना तोशाखाना केसमध्ये अटक करण्यात आली होती. आज त्यांच्या अटकेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष बॅरिस्टर गौहर अली खान यांच्या नेतृत्वात सभा, प्रदर्शन आणि लाँग मार्च काढण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news