PM Modi Seychelles visit :"हिंदी महासागर 'संधींचा महासागर' बनवूया"; PM मोदींचा सेशेल्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव

पंतप्रधानांना आतापर्यंत ३४ देशांचे सर्वोच्च सन्मान
PM Modi Seychelles visit
PM Modi Seychelles visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविताना राष्ट्राध्यक्ष हर्मिनी.Pudhari
Published on
Updated on

PM Modi Seychelles visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि. २८ जून) रविवारी सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'गार्डियन ऑफ ब्लू होरायझन' (Guardian of Blue Horizon) देऊन गौरविण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत तब्बल ३४ देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत.

हिंदी महासागर 'संधींचा महासागर' बनवूया

पंतप्रधान मोदी शनिवारी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी हिंदी महासागरात वसलेल्या सेशेल्समध्ये पोहोचले. रविवारी राजधानी व्हिक्टोरिया येथील 'स्टेट हाऊस'मध्ये राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये बैठक झाली, ज्यामध्ये परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्वोच्‍च सन्मानाने गौरविण्‍यात आल्‍यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सेशेल्सचे नागरिक, सरकार आणि राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. ते म्हणाले की, भारत आणि सेशेल्सने मिळून हिंदी महासागराला 'संधींचा महासागर' बनवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे. यापूर्वी, सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया येथे पंतप्रधान मोदींना औपचारिक 'गार्ड ऑफ ऑनर' देखील देण्यात आला.

PM Modi Seychelles visit
PM Modi Seychelles visit: कोण आहे १९४ वर्षांचा जोनाथन? ज्याला सेशेल्समध्ये पंतप्रधान मोदी भेटणार
PM Modi Seychelles visit
Seychelles : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेला सेशेल्स देश आहे सुंदर व विलोभनिय दृश्यांचा खजाना!

पर्यावरण क्षेत्रात मोदींना आतापर्यंत ३ मोठे सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा हा सर्वोच्च नागरी सन्मान पर्यावरण रक्षण, हवामान बदलाचा सामना करणे आणि दीर्घकाळ पर्यावरण सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने केलेल्या कार्यासाठी मिळाला आहे.

PM Modi Seychelles visit
G7 Summit Melodi Diplomacy: आपण सर्वात फेमस 'कपल', जी ७ समीटमध्ये मेलोनी पंतप्रधान मोदींना नेमकं काय म्हणाल्या?

मोदी-हर्मिनी बैठक; द्विपक्षीय संबंधांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २८) सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशेल्समधील संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.मोदी म्हणाले की, भारत आणि सेशेल्स दोन्ही देशांमधील उद्योगांसाठी नवीन संधी शोधत राहतील. तसेच दोन्ही देशांमधील संपर्क आणि कनेक्टिव्हिटी देखील मजबूत केली जाईल. भारत 'डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर' च्या क्षेत्रातील आपले यशस्वी अनुभव सेशेल्ससोबत शेअर करेल.

PM Modi Seychelles visit
Trump Praises PM Modi : "शांत आणि जबरदस्त, मी त्यांच्यासारखा नाही"; ट्रम्प यांनी केले PM मोदींचे भरभरून कौतुक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news