G7 Summit Melodi Diplomacy: आपण सर्वात फेमस 'कपल', जी ७ समीटमध्ये मेलोनी पंतप्रधान मोदींना नेमकं काय म्हणाल्या?

G7 Summit Melodi Diplomacy
G7 Summit Melodi Diplomacypudhari
Published on
Updated on

G7 Summit Melodi Diplomacy: फ्रान्समध्ये जी ७ सदस्य देशांचे प्रमुख जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत. त्याचबरोबर ते युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी तसेच अमेरिका इराण कराराचे स्वागत करण्यासाठी जी ७ देशांचे प्रतिनिधी फ्रान्समध्ये एकत्र आले आहेत. या बैठकीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असून त्यांची भेट इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी झाली असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर मेलोडी बझ सुरू झाला आहे.

G7 Summit Melodi Diplomacy
G7 Summit: 'मी सिगारेट सोडली...'; मेलोनींच्या उत्तराने पिकला हशा! पाहा जी-७ परिषदेतील पडद्यामागचे रंजक किस्से!

आपण प्रसिद्ध कपल

एका व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेलोनी यांना भेटत आहेत. ते दोघे ग्रुप फोटोसाठी एकत्र आले असताना हस्तांदोलन करताना दिसत आहेत. या व्हिडिओचा ऑडिओ इतका स्पष्ट नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेलोनी यांनी आपण सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालो आहोत असं सांगत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यावर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होय आपण इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध कपल झालो आहोत असं म्हणताना दिसत आहेत.'

G7 Summit Melodi Diplomacy
Modi Melody Gift Meloni: मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना खास ‘Melody’ टॉफी गिफ्ट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी रोमला भेट दिली आण मेलोनी यांनी मेलडी टॉफी गिफ्ट केली होती. या भेटीनंतर सोशल मीडियावर गोड कमेंटचा पाऊस पडला होता. मेलोनी यांनी देखील या गिफ्टबद्दल आभार मानले होते.

G7 Summit Melodi Diplomacy
foreign trips controversy|विदेशी दौऱ्यांवरून घमासान! भाजपच्‍या गंभीर आरोपांनंतर काँग्रेसकडून PM मोदींचा AI व्हिडिओ शेअर

मेलोडी डिप्लोमसी

मलोडी हा मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांच्या शब्दांपासून मिळून तयार झालेला हा शब्द इटली आणि भारत यांच्यातील २०२३ च्या द्विपक्षीय बैठकीनंतर इंटरनेटवर फेमस झाला होता. सोशल मीडियावर याबाबतच्या व्हिडिओ फोटो आणि मिम्सना लाखो व्ह्यूज मिळतात.

मेलोनी यांनी हा शब्दप्रयोग पहिल्यांदा २०२४ मध्ये वापरला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी पोस्ट केला त्यावर हाय फ्रेंड फ्रॉम मेलोनी असं कॅप्शन दिलं होतं. २०२५ मध्ये जी ७ समीटवेळी देखील अशाच प्रकारच्या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news