Namdev Gharal
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेशल्स (Seychelles) या छोट्या बेटांच्या देशाला भेटण्यासाठी गेले आहेत. जाणून घेऊ आफ्रिका खंडाजवळील व हिंदी महासागरातील या छोट्या देशाविषयी
पंतप्रधान मोदी सेशल्सच्या सुवर्ण महोत्सवी (५० व्या) राष्ट्रीय दिनानिमित्त मुख्य पाहुणे म्हणून तेथे उपस्थित राहत आहेत. हा देश भौगोलिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांनी परीपूर्ण आहे
सेशल्स हा एक स्वतंत्र देश आहे. हा पूर्व आफ्रिकेच्या जवळ असलेला आणि हिंदी महासागरातील एक लहान द्वीपसमूह देश आहे.
या देशाची राजधानी 'व्हिक्टोरिया' (Victoria) ही या देशाची राजधानी आहे, जी 'माहे' (Mahe) बेटावर वसलेली आहे.
सर्वात कमी लोखसंख्येचा देश, हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे (अंदाजे १ लाख ३५ हजार).
११५ बेटांचा समूह: सेशल्स हा ११५ लहान-मोठ्या बेटांचा मिळून बनलेला आहे. हा देश प्रामुख्याने दोन प्रकारच्या बेटांमध्ये विभागले गेले आहेत
सेशल्स हा जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक मानला जातो. येथील पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे (White Sand Beaches) आणि नितळ निळे पाणी पर्यटकांना आकर्षित करते.
Aldabra Atoll: हे युनेस्कोचे (UNESCO) जागतिक वारसा स्थळ असून, येथे जगातील सर्वात मोठे 'जायंट टॉर्टॉइज - महाकाय कासव आढळतात.
कोको दे मेर (Coco de Mer): हे जगातील सर्वात मोठे आणि जड बीज (Seed) असणारे नारळाचे झाड आहे, जे फक्त सेशल्सच्या बेटांवरच आढळते. याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हे जगभर प्रसिद्ध आहे.
मानवरहित बेट: सोळाव्या शतकात जेव्हा युरोपियन खलाशांनी या बेटांचा शोध लावला, तेव्हा येथे कोणतीही स्थानिक मानवी वस्ती नव्हती.
फ्रेंच आणि ब्रिटिश राजवट: आधी फ्रेंच आणि नंतर ब्रिटिशांनी यावर राज्य केले. ब्रिटिशांनी आफ्रिकेतून आणलेले गुलाम आणि भारतातून गेलेले मजूर येथे स्थायिक झाले. २९ जून १९७६ रोजी या देशाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले