Asha Bhosle Death News Pakistan: द्वेष!आशा भोसलेंच्या निधनाची बातमी देणं महागात; 'या' न्यूज चॅनलला पाकिस्तान सरकारची नोटीस

Asha Bhosle Death News Pakistan
Asha Bhosle Death News Pakistanpudhari
Published on
Updated on

PEMRA Notice to Geo News: पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (pemra) ने पाकिस्तानातील एक आघाडीच्या न्यूज चॅनलला भारतीय कंटेट दाखवला म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या न्यूज चॅनलने महाग गायिका आशा भोसले यांच्या निधनासंबंधीचे वृत्त दाखवले होते.

पाकिस्तानात भारतीय कंटेट दाखवण्यावर २०१८ पासून बंदी आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने पाकिस्तानातील प्रसिद्ध जिओ न्यूजला आशा भोसलेंच्या निधनाबाबतचे वृत्त दाखवलं म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Asha Bhosle Death News Pakistan
Sangram Patil Look Out Notice: डॉ. संग्राम पाटील प्रकरणात हायकोर्टाचा आदेश; लुकआऊट नोटीसवर तातडीने निर्णय घ्या

जिओ न्यूजने देखील दिली प्रतिक्रिया

जिओ न्यूज चॅनल हे पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज सरकारच्या आणि लष्कराच्या जवळचे समजले जाते. रविवारी आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाले.

दरम्यान, जिओ न्यूजचे मॅनेजिंग डायरेक्टर अझर अब्बास यांनी, 'एखाद्या दिग्गज कलाकारचे काम सेलिब्रेट करणे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणे हा नेहमीचा प्रघात आहे. खरं तर आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्वाचे आम्ही जेवढे कव्हरेज दाखवलेत त्यापेक्षा जास्तच दाखवायला हवे होते. असं असलं तरी पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटर यांनी आमच्यावर बंधने घालण्याचा निर्णय घेतला.' अशी एक्स पोस्ट केली.

Asha Bhosle Death News Pakistan
Australia Social Media Ban |१६ वर्षांखालील मुलांवरील सोशल मीडिया बंदीचे कंपन्यांकडून उल्लंघन : नव्या रिपोर्टमधून माहिती उघड

युद्धात कलाकारांचा बळी जायला नको

अब्बास यांनी सांगितलं की कला, ज्ञान ही माणुसकीचा एकत्रित वारसा आहे. त्याला सीमांमध्ये बंदिस्त करणं योग्य नाही.

आशा भोसले यांनी पाकिस्तानच्या दिग्गज गायिका नूर जहाँ यांची कायम प्रशंसा केली आहे. त्या प्रेमाने त्यांना आपली मोठी बहीण मानत होत्या. त्यांनी नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत काम केलं होतं. त्यांनी महान उर्दू कवी नसीर काझमी यांच्या कवितांमध्ये जीव ओतला होता.'

ते पुढे म्हणाले की, 'युद्ध आणि संघर्षाच्या काळात कला आणि कलाकार यांचा बळी जायला नको. बुद्धीजीवी, संगीतदार आणि क्रिएटर्स हे कायम द्वेशाच्या आणि विभाजनाच्या विरूद्ध आवाज उठवत असतात. तेच लोकांना एकत्र आणण्याचे काम देखील करत असतात.'

Asha Bhosle Death News Pakistan
Asha Bhosle Music Academy : मुंबईत आशा भोसले संगीत ॲकॅडमी स्थापन करण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली?

दरम्यान, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने जिओ न्यूजला आशा भोसले यांच्या निधनाच्या बातमीवेली भारतीय गाणी आणि भारतीय चित्रपटातील दृष्य दाखवणं हा सर्वोच्च न्यायालयाच्या भारतीय कंटेटवर बंदी घालण्याच्या आदेश जाणीवपूर्वक न पाळणे आहे.

नोटीसमध्ये जिओ न्यूजने PEMRA रूल २००९ च्या नियम १५(१) चे उल्लंघन केलं आहे. तसेच PEMRA रेग्युलेशन २०१२ चे १८ १(g), कोड ऑफ कंटक्ट २०१५ चे कलम 4(10), 5, 17, 20 आणि 24 यांचे उल्लंघन केलं आहे असा दावा करण्यात आला आहे. जिओ न्यूजच्या सीईओंना १४ दिवसात लिखित स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news