Sangram Patil Look Out Notice: डॉ. संग्राम पाटील प्रकरणात हायकोर्टाचा आदेश; लुकआऊट नोटीसवर तातडीने निर्णय घ्या

सोशल मीडिया पोस्ट प्रकरणात वाद; परदेशात परतण्यास अडथळा, सरकारला 15 एप्रिलपर्यंत मुदत
Sangram Patil Bombay High Court
Sangram Patil Bombay High CourtPudhari
Published on
Updated on

मुंबई : भाजप नेत्यांविरुद्ध समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर लुक आऊट सर्क्युलर नोटीसमुळे वादात अडकलेले ब्रिटनस्थित डॉक्टर आणि यूट्यूबर ड्रॉ.संग्राम पाटील यांच्याविरोधात जारी केलेल्या लुक आऊट नोटीसवर तातडीने निर्णय घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

Sangram Patil Bombay High Court
Mumbai Hawkers: फेरीवाल्यांच्या ओळखीची कसून पडताळणी करा

आपण परदेशातूनही पोलिसाना तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे .या नोटीसमुळे ब्रिटनला जाता येत नाही, आयुष्य ठप्प झाले आहे. ब्रिटनला परत जाऊन तेथील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करायचे असल्याने लुक आउट सर्क्युलर नोटीस रद्द करावी अशी विनंती डॉ. पाटील यांनी हायकोर्टाला केली. डॉ. पाटील यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर सरकारला त्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

भाजप नेत्यांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी ब्रिटन येथील डॉक्टर आणि युट्यूबर संग्राम पाटील यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला असून, लुक आउट नोटीसही बजावण्यात आली आहे.

Sangram Patil Bombay High Court
BJP Shiv Sena Conflict: विधिमंडळातही भाजपाचा वरचष्मा; सेनेला शह, शिंदेंची हतबलता उघड

डॉ. संग्राम पाटील यांनी हायकोर्टात धाव घेत ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला, ॲड. उज्ज्वलकुमार चव्हाण आणि ॲड. आदित्य हिरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर सुनावणी झाली.

डॉ. पाटील यांनी तपासात पूर्ण सहकार्य केले असून 21 जानेवारीनंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. 18 डिसेंबरच्या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम 353(2) लागू होत नाही. कोठडीतील चौकशीचीही गरज नाही,तसेच जळगावचे रहिवासी असलेले पाटील यांचे आई-वडील आणि घर भारतात आहे.त्यामुळे ते कायमस्वरूपी पळून जाण्याची शक्यता नाही चौकशीदरम्यान पोलिसांना मोबाईल फोन दिला नाही. कारण त्यात रुग्णांची गोपनीय माहिती असल्याने तो देणे शक्य नव्हते.याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

Sangram Patil Bombay High Court
Ashok Kharat Case: खरात प्रकरणात कोणाकोणाचे बिंग फुटणार? सर्वपक्षीय नेत्यांमध्ये अस्वस्थता

सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांनी याचिकेला विरोध केला. पाटील आणि ‌‘शहर आघाडी‌’ या फेसबुक पेजमधील संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. संबंधित पोस्टमुळे दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर पोलिसांशी सहकार्य सुरू ठेवण्याचे आश्वासन देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी डॉ. पाटील यांनी दर्शवली. न्यायालयाने तीन दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगत सुनावणी 15 एप्रिल पर्यंत तहकूब केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news