Pakistan Hindu Girls Conversion | पाकमधील हिंदू मुलींच्या सक्तीच्या धर्मांतराला विरोध करणार्‍या कच्छींना जीवे मारण्‍याची धमकी

आंतरराष्‍ट्रीय समुदायाला केले मदतीचे आवाहन, पाकिस्‍तान सरकारचे दुर्लक्ष
Pakistan Hindu Girls Conversion Row
पाकिस्‍तानमधील सिंध प्रांतातील अल्पसंख्याक हक्क कार्यकर्ते आणि 'दारावर इत्तेहाद' संघटनेचे संस्थापक शिवा कच्छी.imaage x
Published on
Updated on

Pakistan Hindu Girls Conversion Row

उमरकोट (सिंध) : पाकिस्तानातील हिंदू मुलींच्या सक्तीच्या धर्मांतरांविरोधात आवाज उठवणे आता जीवावर बेतू लागले आहे. इस्लामी गट 'तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान' (TLP - सरहिंदी गट) कडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे, अशी एक्‍स पोस्‍ट सिंध प्रांतातील अल्पसंख्याक हक्क कार्यकर्ते आणि 'दारावर इत्तेहाद' या संघटनेचे संस्थापक शिवा कच्छी यांनी केली असून, या प्रकरणी पाकिस्‍तान सरकारचे दुर्लक्ष होत असून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीसाठी 'एसओएस' (SOS) त्‍यांनी धाडला आहे.

Pudhari

'माझा गुन्हा काय?' कच्छी यांचा सवाल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्‍स' वर पोस्‍ट केलेल्‍या व्हिडिओमध्‍ये कच्छी यांनी म्‍हटलं आहे की, "अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण आणि सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी मी काम करत असल्याने मला 'इस्लामविरोधी' आणि 'देशद्रोही' ठरवण्यात येत आहे. माझ्या हत्येसाठी फतवे काढले जात आहेत. माझ्या कुटुंबाला किंवा मला काही झाले, तर त्याला पूर्णपणे पाकिस्तान सरकार जबाबदार असेल."

Pakistan Hindu Girls Conversion Row
Pakistan Division Demands: ४ नाही पाकिस्तानचे १६ तुकडे करा...? भारत नाही त्यांच्याच मंत्र्याची मोठी मागणी
Pudhari

नोव्‍हेंबर २०२५ पासून कट्टरपंथीयांकडून लक्ष्‍य

कच्छी यांनी स्‍पष्‍ट केले आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होते, ज्याचा त्यांनी तीव्र निषेध केला होता. तेव्हापासून कट्टरपंथीयांनी त्यांना लक्ष्य केले आहे.

Pakistan Hindu Girls Conversion Row
India Pakistan nuclear agreement : भारत-पाकिस्तानकडून अणुकेंद्रांच्या याद्यांची देवाणघेवाण; जाणून घ्या १९८८च्या कराराविषयी

सरकारी यंत्रणांचे संशयास्पद मौन

धमक्यांचे गांभीर्य असूनही पाकिस्तानचे केंद्रीय सरकार, सिंध सरकार आणि स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. "राज्य यंत्रणेचे हे मौन म्हणजे गुन्हेगारांना दिलेली साथच आहे," अशी टीका कच्छी यांनी केली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र (UN), मानवाधिकार परिषद, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि अमेरिकन परराष्ट्र विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Pakistan Hindu Girls Conversion Row
Pakistan Army DG ISPR: पाकिस्तानला त्यांचेच नागरिक मारण्याचा हक्क.... पाकिस्तानी लष्कराचे DG ISPR तोंडाला येईल ते बरळले

उमरकोट जिल्‍ह्यात हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मांतर

पाकिस्तानच्या २०२३ च्या जनगणनेनुसार, देशातील सुमारे ४० ते ५० लाख हिंदू लोकसंख्येपैकी ९४% लोक सिंध प्रांतात राहतात. ज्या उमरकोट जिल्ह्यातून कच्छी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो पाकिस्तानातील एकमेव हिंदू बहुसंख्य (५२%) जिल्हा आहे. असे असूनही, येथे हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मांतर ही एक मोठी समस्या बनली आहे.

Pakistan Hindu Girls Conversion Row
Israel On Pakistan Army In Gaza: गाझात पाक लष्कर; इस्त्रायलनं स्पष्टच सांगितलं.... अमेरिकेसह पाकिस्तान तोंडावर आपटलं

'शाहनवाज' प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची भीती

कच्छी यांनी आपल्या व्हिडिओत डॉ. शाहनवाज कुंभार यांचा उल्लेख केला आहे. कुंभार यांची सप्टेंबर २०२४ मध्ये ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असताना बनावट चकमकीत हत्या करण्यात आली होती. त्‍यानंतर जमावाने त्यांचा मृतदेह जाळला होता. आपल्यालाही अशाच प्रकारे संपवण्याचा कट रचला जात असल्याचे कच्छी यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news