

Pakistan Army DG ISPR: पाकिस्तानी लष्कराचे मीडिया विंगचे अधिकारी DG ISPR नेहमी त्यांच्या विदुषकी वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी ते महिला रिपोर्टरला डोळा मारतात तर कधी असा दावा करतात की सर्वजण डोक्याला हात लावलात. पाकिस्तानचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन (DG ISPR) चे लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी लोकांना तुम्हाला मजा आली नाही तर पैसे परत अशी अजब गॅरेंटी दिली. तसंच पाकिस्तानी नागरिकांना मारण्याचा अधिकार फक्त पाकिस्तानी लष्कराला आहे असं धक्कादायक वक्तव्य देखील केलं.
अहमद शरीफ चौधरी हे आपल्या प्रत्येक पत्रकार परिषदेत भारताला पोकळ धमक्या देतच असतात. मात्र यावेळीची त्यांची धमकीत विनोदाचे अनेक स्फोट होते. अहमद चौधरी म्हणतात की, 'तुम्हाला जे करायचं आहे ते करा. डावीकडून या, उजवीकडून या, वरून या, खालून या, एकटे या किंवा कोणाला सोबत घेऊन या एकदा तुमची मजा केली नाही तर पैसे परत.'
आता अहमद शरीफ चौधरी यांना वाटतं की आपण असं फिल्मी अन् वाटेल तसं बोललो तर लोकं खुश होतील. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याची खिल्लीच उडवली जात आहे.
अहमद शरीफ चौधरी इथंच थांबले नाहीत. त्यांनी २०२६ वर्ष कसे असेल याचे देखील ज्ञान पाजळले. त्यांनी हे वर्ष कसं असेल हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण कशी प्रतिक्रिया देतो. यावर सर्व अवलंबून आहे. आपल्या नेतृत्वाचा दृष्टीकोण याबाबत स्पष्ट आहे असंही ते म्हणाले.
लष्कराची पत्रकार परिषद ही नेहमी औपचारिक असते. त्यात धोरणे आणि सज्जता यावर चर्चा होते. मात्र पाकिस्तानी डीजी आयएसपीआर नेमही प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतावर टीका करण्याचा अजेंडा राबवत असते. मात्र यावेळी पत्रकार परिषदेत मोठा बदल करण्यात आला. त्यांनी लष्करी किंवा राजनैतिक भाषा न वापरता सडक छाप भाषेचा वापर केला.
लष्करी वर्तुळात याला पाकिस्तान लष्करातील असुरक्षीत भावनेचे चित्रण करणारी पत्रकार परिषद म्हणून पाहिलं जात आहे. चौधरी यांनी खुलासा केला की पाकिस्तानी नागरिकांना मारण्याचा हक्क फक्त त्यांनाच आहे दुसऱ्या कोणाला नाही.
चौधरी म्हणाले की, त्या लोकांनी पाकिस्तानी नागरिकांना हिट केलं. त्यांनी असं केलं नाही का? पाकिस्तानातील महिलांना आणि मुलांना मारलं. त्यांनी असं केलं नाही का? आम्ही ऑक्टोबर महिन्यात कोणाला हिट केलं होत. अफगाणिस्तानला मारलं नव्हतं. ते स्वतः म्हणतात की ते पाकिस्तानी आहेत. आम्ही आमच्या नागरिकांनाच हिट केलं. आम्ही आमच्याच नागरिकांना मारलं. हा हक्क फक्त रियासत ए पाकिस्तानला आहे. संविधानानुसार आणि कायद्यानुसार आम्ही आमच्याच शहरांना शिक्षा करावी. भारत कोण आहे.?