Pakistan Army Gaza Deployment: ‘गाझा’ मुद्द्यावरून पाकिस्तान सैन्यात बंडाची चिन्हे; असीम मुनीर यांच्याविरोधात माजी सैनिकांचा एल्गार

गाझात सैन्य पाठवण्याच्या चर्चेमुळे अंतर्गत असंतोष वाढला; सरकार-लष्कर नेतृत्वावर गंभीर आरोप
Pakistan Army Gaza Deployment
Pakistan Army Gaza DeploymentPudhari
Published on
Updated on

इस्लामाबाद : गाझामध्ये सैन्य तैनात करण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान सैन्यात अंतर्गत बंडाळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्या विरोधात माजी सैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून वेटरन्स ऑफ पाकिस्तान या संघटनेने एक खळबळजनक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकाद्वारे लष्करप्रमुखांच्या निर्णयाला कडाडून विरोध करत, सैनिकांना बंडाचे आवाहन करण्यात आले आहे.

Pakistan Army Gaza Deployment
Jeffrey Epstein Files Donald Trump: एपस्टिन फाईल्समध्ये ट्रम्प यांचा 38 हजार वेळा उल्लेख

मुस्लिम उम्माहशी प्रतारणा केल्याचा आरोप

या प्रसिद्धीपत्रकात पाकिस्तान सरकारवर मुस्लिम उम्माहचा (मुस्लिम ब्रदरहूड) विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माजी सैनिकांनी थेट कार्यरत लष्करी अधिकारी आणि जवानांना उद्देशून म्हटले आहे की, तुम्ही केवळ सैनिक नसून या पवित्र भूमीचे रक्षक आहात. तुम्ही देशाचे हृदय आहात. तुमच्यावर इस्लाम आणि न्यायाच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली आहे.

बोर्ड ऑफ पीसला विरोध

या वादाचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्तावित बोर्ड ऑफ पीस हा उपक्रम आहे. गाझामधील स्थिती हाताळण्यासाठी या बोर्डात पाकिस्तानचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा माजी सैनिकांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या बोर्डामध्ये झायोनिस्ट (ज्यू) आणि ख्रिस्ती एकत्र बसून अल-कुद्सवरील कब्जाचे समर्थन करत आहेत, तर पीडित पॅलेस्टिनींचा आवाज दाबला जात आहे. अशा अमेरिकन साम्राज्यवाद आणि झायोनिस्ट कारस्थानात पाकिस्तानचा सहभाग असणे म्हणजे इस्लामच्या शत्रूंशी हातमिळवणी करण्यासारखे आहे.

Pakistan Army Gaza Deployment
AI in Agriculture Maharashtra: एआयच्या साहाय्याने कृषी क्षेत्रात क्रांती शक्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लष्करी नेतृत्वाला गंभीर इशारा

माजी सैनिकांनी लष्करी नेतृत्वाला मदर इन्स्टिट्यूशन संबोधत कडक शब्दांत ताकीद दिली आहे. हे गठबंधन तत्काळ आणि विनाअट फेटाळून लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर सैन्य नेतृत्व या दबावापुढे झुकले आणि ज्यू-ख्रिस्ती शक्तींशी हातमिळवणी केली, तर प्रत्येक सैनिकाच्या मनात प्रश्न निर्माण होईल की, मशीद अल-अक्साच्या शत्रूंसाठी लढताना कोणी शहादत कशी प्राप्त करू शकेल, असा सवालही यात उपस्थित करण्यात आला आहे.

अंतर्गत असंतोष, बंडाची चिन्हे

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ माजी सैनिकच नव्हे, तर खुद्द पाकिस्तानी सैन्यातही गाझा मोहिमेवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी सरकार आणि लष्करप्रमुखांच्या या धोरणाविरोधात आहेत. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अमेरिकेत असून त्यांनी ट्रम्प प्रशासनाकडे सैन्य पाठवण्याबाबत काही कालावधी मागितला असल्याचे समजते. शरीफ यांनी देशांतर्गत परिस्थितीचा हवाला देत ही सवलत मागितली असली, तरी प्रत्यक्षात सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तानात मोठे लष्करी बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pakistan Army Gaza Deployment
Google India AI Investment: भारतात गुगलची 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

मुनीर माझे बॉस नाहीत : संरक्षणमंत्री

पाकिस्तानमध्ये सरकार लष्कराच्या इशाऱ्यावर चालते, ही चर्चा जगजाहीर आहे. मात्र, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी या वादात उडी घेत लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी असलेल्या संबंधांवर मोठे विधान केले आहे. जनरल असीम मुनीर हे माझे बॉस नाहीत. माझे बॉस केवळ पंतप्रधान शहबाज शरीफ आहेत, असे ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news