Jeffrey Epstein Files Donald Trump: एपस्टिन फाईल्समध्ये ट्रम्प यांचा 38 हजार वेळा उल्लेख

दहा देशांत राजीनामासत्र; 80 हून अधिक शक्तिशाली व्यक्तींची चौकशी सुरू
Donald Trump
Donald Trump(file photo)
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टिनशी संबंधित गुप्त दस्तऐवज सार्वजनिक झाल्यामुळे जगभरात खळबळ उडालेली असताना अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केलेल्या फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव 38,000 पेक्षा जास्त वेळा आले आहे. ट्रम्प रेकॉर्डनुसार, 1990 च्या दशकात ट्रम्प यांनी एपस्टिनच्या खासगी विमानाने 7-8 वेळा प्रवास केला होता, तसेच एपस्टिनचे नाव ट्रम्प यांच्या मार-ए-लागो क्लबच्या गेस्ट लिस्टमध्येही होते. या फाईल्समध्ये बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांची नावे वेगवेगळ्या संदर्भात आली आहेत.

Donald Trump
Tuition Teacher Beating | संतापजनक! पाढे पाठ केले नाहीत म्हणून आठवीच्या विद्यार्थिनीला उलथण्याने दिले 40 फटके

यातील अनेक प्रकरणे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची आहेत. या फाईल्स खुल्या झाल्यानंतर 10 देशांतील 15 हून अधिक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आपली पदे सोडावी लागली आहेत. 80 हून अधिक शक्तिशाली व्यक्तींची चौकशी सुरू आहे. नेते, राजदूत, अरबपती आणि राजघराण्यातील लोकांची नावे यात आहेत. ई-मेल, फ्लाईट लॉग आणि संपर्क नोंदीत 700 तेे 1000 शक्तिशाली लोकांची नावे आहेत.

Donald Trump
Mumbai Corporators Announcement: स्वीकृत नगरसेवकांची नावे शुक्रवारीपर्यंत सादर करा; 25 फेब्रुवारीला होणार घोषणा

युरोपमध्ये एपस्टिन त्सुनामी; ब्रिटन, नॉर्वेच्या राजघराण्यावर टांगती तलवार एपस्टिन प्रकरणाचे सर्वाधिक पडसाद युरोपमध्ये उमटले आहेत. ब्रिटनमध्ये सर्वाधिक राजीनामे सत्र पाहायला मिळाले. यात माजी राजदूत पीटर मँडेलसन, सल्लागार ॲडम पेरी आणि पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्वीनी यांचा समावेश आहे.

Donald Trump
Rajya Sabha elections 2026 | महाराष्ट्रातून राज्यसभेवर 7 जणांना संधी; शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

स्लोव्हाकियाचे माजी परराष्ट्र मंत्री मिरोस्लाव लाइचाक यांनी 300 हून अधिक आक्षेपार्ह ई-मेल आणि चॅटस्‌‍ समोर आल्यानंतर राजीनामा दिला. स्वीडनचे ज्येष्ठ मुत्सद्दी जोआना रुबिनस्टीन यांनी आपले पद सोडले आहे. नॉर्वेची राजदूत मोना जूल यांच्यासह अनेक बड्या नावांवर कारवाईची टांगती तलवार आहे. अमेरिकेचे कामगार मंत्री ॲलेक्स अकोस्टा आणि लॅब प्रमुख जोइची इतो यांनी राजीनामा दिला आहे.

Donald Trump
Rohit Pawar | पायलटच्या मदतीने अजित पवारांचा घातपात; रोहित पवारांचा आरोप

तपासाचे आदेश आणि राजकीय पेच

या खुलाशामुळे अनेक देशांच्या सरकारांसमोर राजनैतिक आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना जाहीर माफी मागावी लागली, तर प्रिन्स अँड्य्रू यांच्या विरोधात एपस्टिन फाईल्समध्ये ट्रम्प यांचा 38 हजार वेळा उल्लेख

ब्रिटिश पोलिसांनी नव्या फाईल्सच्या आधारे फ्रेश रिव्ह्यू (पुनर्तपास) सुरू केला आहे. फ्रान्समध्ये माजी मंत्री जॅक लँग यांना अधिकृत समन्स बजावण्यात आले आहे.

पोलंड, लाटविया आणि तुर्की या देशांनी मानवी तस्करीतील अधिकृत संगनमताची चौकशी करण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. नॉर्वेमध्ये राजदूत मोना जुएल यांना निलंबित करण्यात आले आहे. माजी थोरबजॉर्न जगलँड यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे, तर ज्येष्ठ मुत्सद्दी तेर्झे रोड-लार्सन यांचीही चौकशी सुरू आहे.

Donald Trump
Western Railway AC Local Increase: शिवजयंतीपासून मुंबईकरांना गारेगार दिलासा; पश्चिम रेल्वेच्या 12 एसी व 3 नव्या लोकलची भर

बिल गेटस्‌‍ यांच्याकडून खेद व्यक्त

या प्रकरणात काही जागतिक स्तरावरील मोठ्या व्यक्तींनी जाहीर माफी वा खेद व्यएपस्टिन केला आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस्‌‍ यांनी एपस्टिनसोबतच्या भेटींबद्दल खेद व्यक्त केला असून त्यांनी फाऊंडेशनच्या बोर्डाचा राजीनामा दिला आहे. इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद बराक यांचे नाव एपस्टिनच्या न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये मुक्कामाला असलेल्यांच्या यादीत आल्यानंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. नॉर्वेच्या क्राऊन प्रिन्सेस प्रिन्सेस मेट-मारिटनाही या प्रकरणात सार्वजनिक माफी मागितली आहे.

Donald Trump
UPI Paymentला ‘बायोमेट्रिक’ पासवर्ड, लहान व्यवहारांसाठी चेहरा; बोटांच्या ठशांचाही पर्याय

30 लाख पानी कागदपत्रे

अमेरिकेच्या न्याय विभागाने 30 जानेवारी रोजी सुमारे 30 लाख पानांची कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये रोज नवनव्या व्यक्तींची नावे येत आहेत. या फाईल्समध्ये जगभरातील दिग्गज नेते, राजदूत, अब्जाधीश आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. ई-मेल, फ्लाईट लॉग आणि संपर्क नोंदींनुसार सुमारे 700 ते 1000 प्रभावशाली व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

2005 मध्ये फुटली वाचा

फ्लोरिडातील एका 14 वर्षीय मुलीच्या आईने सन 2005 मध्ये पहिल्यांदा तक्रार केली होती. त्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटली. तपासादरम्यान 30 अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवण्यात आले. एपस्टिनने केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात लैंगिक शोषणाचे आणि मानवी तस्करीचे एक संघटित जाळे (नेटवर्क) विणले होते. त्याचे धागेदोरे आता 15 देशांपर्यंत पोहोचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news