Pakistan train blast: पाकिस्तान हादरले! रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २४ सैनिकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात भीषण दहशतवादी हल्ला झाला. क्वेटा लष्करी छावणी येथून निघालेल्या एका प्रवासी रेल्वेला लक्ष्य करून आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला आहे.
Pakistan train
Pakistan trainFile Photo
Published on
Updated on

Pakistan train blast

क्वेटा: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात आज (दि. २४) सकाळी भीषण दहशतवादी हल्ला झाला. क्वेटा लष्करी छावणी येथून निघालेल्या एका प्रवासी ट्रेनला लक्ष्य करून करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात २४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून, १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. 'बलुच लिबरेशन आर्मी' या संघटनेने या भीषण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

क्वेटा लष्करी छावणीतून प्रवाशांना घेऊन निघालेली ही ट्रेन अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या 'चमन फाटक'जवळ पोहोचली असता, एका वाहनाच्या साहाय्याने हा शक्तिशाली आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला. या ट्रेनमधून पाकिस्तान लष्कराचे ३०० हून अधिक जवान प्रवास करत होते. त्यांनाच लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर येत आहे.

Pakistan train
Donald Trump : 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स'’च्या डिनर दरम्यान गोळीबार; हल्‍लेखोराला पकडले

ट्रेनची बोगी खाक; परिसरात प्रचंड नुकसान

हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, ट्रेनची एक बोगी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून इतर तीन बोगी रुळावरून घसरल्या. स्फोटानंतर ट्रेनला भीषण आग लागली. रेल्वेची बोगी पूर्णपणे जळून कोळसा झाल्याचे दिसत आहे. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला असलेल्या घरांचे आणि वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने क्वेटा येथील सिव्हिल रुग्णालय आणि लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

'बलुच लिबरेशन आर्मी'ने स्वीकारली जबाबदारी

या हल्ल्यानंतर 'बलुच लिबरेशन आर्मी'च्या 'मजीद ब्रिगेड' या आत्मघाती पथकाने एका पत्रकाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. "क्वेटा कॅन्टोन्मेंटमधून सैन्याला घेऊन जाणाऱ्या ट्रेनला आमच्या फिदायीन पथकाने अत्यंत सुनियोजितपणे लक्ष्य केले," असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या कारवाईचा सविस्तर अहवाल आणि लष्कराचे झालेले नुकसान लवकरच जाहीर करू, अशी धमकीही बीएलएने दिली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली असून बलुचिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

Pakistan train
Trump China Visit: चीनकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू आणि फोन ट्रम्प यांनी कचऱ्यात फेकले; धक्कादायक कारण आले समोर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news