Jensen Huang Net Worth: एनव्हिडिया सोडल्यास जेन्सन हुआंग यांना ९०० कोटींचे नुकसान; त्यांच्याकडे किती आहे एकूण संपत्ती?

'एनव्हिडिया'चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांच्या कंपनीतून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे त्यांना तब्बल १०८ दशलक्ष डॉलर (९०० कोटी रुपयांहून अधिक) किमतीचे शेअर्स गमवावे लागू शकतात.
Jensen Huang
Jensen Huang File Photo
Published on: 
Updated on: 

Jensen Huang Net Worth:

नवी दिल्ली: जगातील सर्वात मौल्यवान सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'एनव्हिडिया'चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग (वय ६३) यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन विवाहबाह्य संबंधाची प्रकरणे समोर आल्यानंतर आणि त्यापैकी एका महिलेवर चीनसाठी हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. जेन्सन यांच्या कंपनीतून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे त्यांना तब्बल १०८ दशलक्ष डॉलर (९०० कोटी रुपयांहून अधिक) किमतीचे शेअर्स गमवावे लागू शकतात.

ही रक्कम भारतीय रुपयांत ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असली, तरी कंपनीतील ३३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कमावलेल्या अफाट संपत्तीच्या तुलनेत हा एक अतिशय छोटा हिस्सा आहे. १४४.५ अब्ज डॉलर्सची अंदाजित संपत्ती असलेले हुआंग कंपनी सोडताना आपल्या एकूण संपत्तीपैकी केवळ ०.०७% हिस्सा गमावणार आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी सोडताना त्यांना अद्याप मिळालेले नसलेले शेअर पुरस्कार सोडावे लागणार आहेत.

Jensen Huang
Nvidia Jensen Huang: एनव्हिडियाचे CEO जेन्सन यांची किती अफेअर्स? आता कंपनीतीलच एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे समोर

हुआंग यांच्या कंपनीतून बाहेर पडण्याच्या चर्चेदरम्यान Nvidia च्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर कंपनीचे बाजारमूल्य २०२५ नंतर पहिल्यांदाच चार ट्रिलियन डॉलरच्या खाली आले. मात्र, शेअरच्या किमतीत घसरण होऊनही हुआंग यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा आधार त्यांच्याकडे असलेले Nvidia चे शेअर्स आहेत. या शेअर्सचे मूल्य सुमारे १३५ अब्ज डॉलर आहे.

कंपनी सोडताना १०८ दशलक्ष डॉलरचे शेअर्स गमावणार

हुआंग यांना होणारा १०८ दशलक्ष डॉलरचा तोटा हा अद्याप त्यांच्या नावावर न झालेल्या शेअर पुरस्कारांमुळे आहे. Nvidia च्या इक्विटी कम्पेन्सेशन धोरणानुसार, कंपनी सोडणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे अनव्हेस्टेड रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स सोडावे लागतात. हुआंग यांच्याकडे अशा प्रकारचे सुमारे ३ लाख ४६ हजार शेअर युनिट्स होते. तसेच, कंपनीच्या इक्विटी इन्सेंटिव्ह प्लॅनअंतर्गत ठरवून दिलेली कामगिरीची उद्दिष्टे पूर्ण झाल्यास त्यांना सुमारे ३ लाख १० हजार शेअर्स मिळणार होते. मात्र, कंपनीतून बाहेर पडल्यामुळे हे शेअर पुरस्कार आता त्यांना मिळणार नाहीत. दरम्यान, फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून हुआंग टॉप १० मधून बाहेर पडले आहेत. त्यांच्या संपत्तीत २.८ अब्ज डॉलर म्हणजेच १.९७ टक्क्यांची घट झाली आहे.

Nvidia च्या आर्थिक वर्ष २०२६ च्या वार्षिक अहवालानुसार, हुआंग यांना या वर्षात एकूण ३ कोटी ६३ लाख ४३ हजार ८३० डॉलर इतके मानधन मिळाले. मागील आर्थिक वर्षात त्यांना ४९.८७ दशलक्ष डॉलर मिळाले होते. म्हणजेच त्यांच्या मानधनात घट झाली आहे. त्यांच्या मानधनात सुमारे १५ लाख डॉलरचे मूळ वेतन, सुमारे २४.८ दशलक्ष डॉलर्सचे स्टॉक अवॉर्ड्स आणि ६ दशलक्ष डॉलर्सचा 'नॉन-इक्विटी' प्रोत्साहन मोबदला यांचा समावेश होता. उर्वरित रक्कम इतर भत्ते आणि लाभांच्या स्वरूपात होती.

हुआंग यांची १४४.५ अब्ज डॉलर्सची संपत्ती कोठून आली?

जेन्सेन हुआंग यांच्या एकूण संपत्तीपैकी जवळपास सर्व संपत्ती Nvidia च्या शेअर्समधून आली आहे. त्यांनी आपली संपत्ती प्रामुख्याने कंपनीचे शेअर्स स्वतःच्या मालकीचे ठेवून कमावली आहे. त्यांच्याकडे एनव्हिडियाचे सुमारे ८१२ दशलक्ष शेअर्स आहेत, ज्यांचे मूल्य गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा सुमारे १३५ अब्ज डॉलर्स इतके होते. यामुळे ते कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक ठरतात. त्यांची ही भागीदारी एनव्हिडियाच्या एकूण भांडवलाच्या ५% पेक्षा कमी आहे. ब्लूमबर्गच्या 'वेल्थ इंडेक्स'नुसार, हुआंग यांच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे ९७% हिस्सा एनव्हिडियाच्या शेअर्सचा आहे. त्यांची ही गुंतवणूक थेट त्यांच्या मालकीचे शेअर्स, कौटुंबिक ट्रस्ट आणि होल्डिंग कंपन्या अशा विविध माध्यमांतून विभागलेली आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या धर्मादाय संस्थेकडे एनव्हिडियाचे सुमारे ५९ दशलक्ष शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य ९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

Nvidia चे शेअर्स विकून हुआंग यांनी आतापर्यंत कमावले ३ अब्ज डॉलर

'कॅपिटल आयक्यू' डेटा आणि कंपनीच्या अधिकृत कागदपत्रांनुसार, जरी हुआंग यांनी एनव्हिडियामधील आपले बहुतेक शेअर्स स्वतःकडेच ठेवले असले, तरी १९९९ मध्ये कंपनी सार्वजनिक झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत सुमारे ३ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना, सुरुवातीच्या काळात त्यांची वार्षिक शेअर विक्री तुलनेने कमी होती क्वचितच ती काही दशलक्ष डॉलर्सच्या वर जात असे. मात्र, 'एआय' क्रांतीच्या काळात एनव्हिडियाचे मूल्य वाढल्यामुळे ही परिस्थिती बदलली. २०२४ मध्ये हुआंग यांनी सुमारे ७१३ दशलक्ष डॉलर्सचे शेअर्स विकले, तर २०२५ मध्ये त्यांनी सुमारे १ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले. यावर्षी त्यांनी अद्याप एकही शेअर विकलेला नाही.

हुआंग आता आपले शेअर्स रोख रकमेत रूपांतरित करू शकतील का?

Nvidia मधील नेतृत्वाची जबाबदारी सोडल्यानंतर आता हुआंग आपल्याकडील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करणार का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सची प्रचंड संख्या पाहता त्यांची विक्री करणे तितके सोपे नाही. Nvidia च्या एका मोठ्या ग्राहक कंपनीतील चिनी अधिकाऱ्याशी हुआंग यांचे संबंध असल्याच्या मुद्द्यावर संभाव्य कायदेशीर चौकशी होण्याची शक्यता आहे.

Jensen Huang
Jensen Huang Resignation: जेनसन यांचे कथित तीन अफेअर्स तरी कर्मचाऱ्यांनी अजून एक संधी देण्याची केली जोरदार मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.