Nvidia Jensen Huang: एनव्हिडियाचे CEO जेन्सन यांची किती अफेअर्स? आता कंपनीतीलच एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे समोर

एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या आणखी एका कथित विवाहबाह्य संबंधाची माहिती समोर आली आहे.
Nvidia Jensen Huang and Kimberly Powell
Nvidia Jensen Huang and Kimberly PowellFile Photo
Published on: 
Updated on: 

Nvidia Jensen Huang affair

वॉशिंग्टन: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील दिग्गज कंपनी एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबत जगभरात चर्चा सुरू असतानाच, आता एका नवीन कथित संबंधाची माहिती समोर आली आहे. ज्यात कंपनीतीलच एका कर्मचारी महिलेचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. याआधी या संबंधांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या एका वृत्तानुसार, हुआंग यांचे कंपनीतील 'हेल्थकेअर' विभागाच्या उपाध्यक्षा किम्बर्ली पॉवेल यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पॉवेल थेट हुआंग यांच्या हाताखाली काम करतात. मार्च महिन्यात सॅन होजे येथे झालेल्या एनव्हिडियाच्या एका परिषदेदरम्यान, ६३ वर्षीय हुआंग आणि ४८ वर्षीय पॉवेल यांना एका हॉटेलमध्ये अत्यंत जवळीक साधलेल्या स्थितीत पाहिल्याचे वृत्त आहे. ही घटना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात टिपली होती. मात्र, हुआंग यांच्या सुरक्षा पथकाने तातडीने त्या व्यक्तीला पकडले आणि त्याच्याकडून 'नॉन-डिस्क्लोजर ॲग्रीमेंट'वर सही करून घेतली. हे दोघेही विवाहित असून त्यांचे जोडीदार वेगळे आहेत.

Nvidia Jensen Huang and Kimberly Powell
Nvidia CEO Jensen Huang resigns : चिनी 'हेर' महिलेसोबतचे 'संबंध' भोवले! अखेर जेन्सेन हुआंग यांनी 'एनव्हिडिया'च्या सर्व पदांचा दिला राजीनामा

कोण आहेत किम्बर्ली पॉवेल?

एनव्हिडियाच्या वेबसाइटनुसार, ४८ वर्षीय पॉवेल २००८ मध्ये या चिपमेकर कंपनीत रुजू झाल्या. त्या कंपनीच्या जागतिक आरोग्यसेवा व्यवसायाचे नेतृत्व करतात. यामध्ये 'ॲक्सिलरेटेड कम्प्युटिंग', एआय आणि व्हिज्युअलायझेशनसाठी लागणारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म्स समाविष्ट आहेत.

याआधी, पॉवेल यांनी कंपनीच्या उच्च शिक्षण आणि संशोधन व्यवसायाचे नेतृत्व केले होते. तसेच, 'एनव्हिडिया एआय लॅब्स' आणि 'एनव्हिडिया इनसेप्शन' कार्यक्रमासारख्या धोरणात्मक उपक्रमांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून असे दिसून येते की, पॉवेल यांनी एनव्हिडियामध्ये हळूहळू प्रगती करत वरिष्ठ पदांपर्यंत मजल मारली आहे. कंपनीत काम सुरू करताना त्यांच्यावर वैद्यकीय इमेजिंग उपकरणांसाठी 'एनव्हिडिया जीपीयू' हे एक 'ॲक्सिलरेटर प्लॅटफॉर्म' म्हणून स्थापित करण्याची जबाबदारी होती.

त्यानंतर, २०१६ मध्ये त्यांची 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिझनेस डेव्हलपमेंट'च्या वरिष्ठ संचालक पदावर पदोन्नती झाली. २०१७ च्या अखेरीस, त्यांची आरोग्यसेवा विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, पॉवेल जगभरातील तंत्रज्ञान परिषदांमध्ये सहभागी होत असत आणि कंपनीच्या वतीने भाषणेही देत ​​असत. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात सॅन होजे येथे आयोजित एनव्हिडियाच्या वार्षिक डेव्हलपर परिषद, 'जीटीईसी' मध्येही त्या उपस्थित होत्या. तिथे त्यांनी आरोग्यसेवा आणि जीवशास्त्राच्या क्षेत्रात मोठी प्रगती साधण्यासाठी एआयच्या वापराबाबत चर्चा केली. आपल्या सादरीकरणादरम्यान त्यांनी हुआंग यांची व्यंगचित्रेही समाविष्ट केली होती.

हुआंग आणि पॉवेल यांच्यातील जवळीक

परिषदेदरम्यान, एनव्हीडियाचे अधिकारी जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. असे वृत्त आहे की, ६३ वर्षीय हुआंग आणि पॉवेल यांना एका खासगी आणि जवळीक दर्शवणाऱ्या स्थितीत पाहिले गेले. या घटनेची माहिती असलेल्या तीन व्यक्तींनी 'द न्यूयॉर्क टाइम्स'ला सांगितले की, तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यानंतर, हुआंग यांच्या सुरक्षा पथकाने त्या व्यक्तीला पकडले आणि तिच्याकडून एक 'नॉन-डिस्क्लोजर ॲग्रीमेंट' (गोपनीयता करार) स्वाक्षरी करून घेतला.

पॉवेल यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, एनव्हीडियामध्ये येण्यापूर्वी, त्यांनी जानेवारी १९९९ ते एप्रिल २००३ या काळात 'डोम इमेजिंग सिस्टम्स' मध्ये हार्डवेअर इंजिनिअर म्हणून काम केले होते. याव्यतिरिक्त, त्यांनी 'प्लानर सिस्टम्स, इंक.' च्या वैद्यकीय व्यवसाय विभागातही पाच वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.

आधीच समोर आलेले 'मेगास्पीड' प्रकरण

याआधी, सिंगापूरस्थित डेटा सेंटर कंपनी 'मेगास्पीड'च्या सीनियर एक्झिजीकिव्ह ॲलिस हुआंग यांच्यासोबतच्या संबंधांचीही बरीच चर्चा झाली आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, २०२४ आणि २०२५ मध्ये या दोघांना तैपेईमध्ये एकत्र पाहिले गेले होते. विशेष म्हणजे, अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने एका मेमोद्वारे असा आरोप केला होता की, ॲलिस हुआंग या चीनच्या मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्योरिटीच्या एजंट असू शकतात. या वाढत्या दबावानंतर, जेन्सेन हुआंग यांनी नुकतेच रविवारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका संदेशात आपली चूक कबूल केली असून, "मी माझ्या पत्नीशी बेवफाई केली आहे," असे म्हटले आहे.

Nvidia Jensen Huang and Kimberly Powell
Jensen Huang Affair: Nvidiaचे CEO जेनसन हुआंग यांचं दुसरं अफेअर उघड? कोण आहे 'ती' महिला? कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनीच फोडलं बिंग
Nvidia Jensen Huang and Kimberly Powell
Nvidia Jensen Huang Controversy: एनवीडियाच्या सीईओंना पत्नीला धोका देणं पडणार महागात; संपत्तीत होणार मोठी घट?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.