Nikhil Gupta Jail: पन्नू हत्या कट प्रकरणात निखिल गुप्ता अडकले! २४ वर्षांची शिक्षा होणार? २० नोव्हेंबरला होणार सुनावणी

Nikhil Gupta Jail Sentence: २० नोव्हेंबरला शिक्षेवर सुनावणी होणार असून, चांगल्या वर्तनामुळे गुप्ता यांना शिक्षेत १५ टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.
Nikhil Gupta Jail Sentence
Nikhil Gupta Jail SentencePudhari
Published on: 
Updated on: 

Nikhil Gupta Jail Sentence: अमेरिकेत खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ताच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी त्यांना २४ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, निखिल गुप्ताच्या वकिलांनी १२ वर्षांची शिक्षा देण्याची विनंती केली आहे. या प्रकरणात २० नोव्हेंबरला न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

निखिल गुप्तावर अमेरिकेत राहणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पन्नू हा 'शीख फॉर जस्टिस' या संघटनेचा प्रमुख आहे.

या प्रकरणात निखिल गुप्ताने फेब्रुवारी महिन्यात आरोप मान्य केले होते. पन्नूची हत्या करण्यासाठी पैसे देण्याचा कट रचल्याचा आणि मनी लाँडरिंगचा त्याच्यावर आरोप आहे.

२४ वर्षांची शिक्षा का मागितली?

अमेरिकेच्या सरकारी वकिलांच्या मते, परदेशात राहणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे निखिल गुप्ताला २४ वर्षांची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली आहे.

दुसरीकडे, गुप्ता यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, त्यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाचला आहे. म्हणून त्यांना १२ वर्षांची शिक्षा द्यावी, अशी विनंती वकिलांनी केली आहे.

Nikhil Gupta Jail Sentence
Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात 24 कॅरेट सोनं 5,950 रुपयांनी स्वस्त

निखिल गुप्ता म्हणतात, 'माझी फसवणूक झाली'

निखिल गुप्ताने आपण एका व्यक्तीच्या फसवणुकीला बळी पडलो, असा दावा केला आहे. त्या व्यक्तीने आपल्यावरील खटले मिटवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याबदल्यात पन्नूच्या हत्येचा कट रचण्यास सांगितले होते, असे गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांनी न्यायालयाला पत्र लिहून आपल्या कृत्याबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला आहे.

तुरुंगातील चांगल्या वर्तनामुळे शिक्षा कमी होऊ शकते?

अमेरिकेच्या नियमांनुसार, तुरुंगात चांगले वर्तन ठेवल्यास शिक्षेत काही प्रमाणात सूट मिळू शकते. ही सूट जास्तीत जास्त १५ टक्क्यांपर्यंत असू शकते.

याशिवाय, गुप्ता यांनी आरोप मान्य केल्यामुळे त्यांच्या शिक्षेत आणखी काही प्रमाणात सवलत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय न्यायालय घेईल.

Nikhil Gupta Jail Sentence
Couple Startup: लाखो रुपयांची आयटीची नोकरी सोडली, ९ महिन्यांत जोडप्याने उभा केला ५६ लाखांचा व्यवसाय; नेमकं काय केलं?

२० नोव्हेंबरला काय होणार?

निखिल गुप्ता यांना २०२४ मध्ये प्राग येथून अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले होते. तेव्हापासून ते न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील कोठडीत आहेत. आता २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय त्यांच्या शिक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

सरकारी पक्षाने २४ वर्षांची शिक्षा मागितली आहे, तर बचाव पक्षाने १२ वर्षांची शिक्षा देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे निखिल गुप्ताला नेमकी किती वर्षांची शिक्षा सुनावली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.