NASA Artemis II Mission Moon| चंद्राच्या कुशीत शोधला जाणार पृथ्वीचा 'भूतकाळ'!, 'आर्टेमिस II' करणार विवरांचा सखोल अभ्यास

NASA Artemis II Mission Moon Study | चंद्राच्या दूरच्या बाजूला असलेली विवरे सूर्यमालेत घडलेल्या प्राचीन आघातांचा जिवंत पुरावा
NASA Artemis II Mission Moon
पृथ्वीच्या निर्मितीपासूनचा आतापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास समजून घेण्यासाठी आर्टेमिस II मोहिमेमधील टीम चंद्रावरील विवरांचा अभ्यास करणार आहे.image x
Published on
Updated on
Summary

नासाचे अंतराळवीर ख्रिस विल्यम्स यांनी 'एक्स'वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "आर्टेमिस II टीम जेव्हा चंद्राच्या जवळ पोहोचेल, तेव्हा त्यांना चंद्राचा पृष्ठभाग अतिशय स्पष्टपणे आणि जवळून पाहता येईल."

NASA Artemis II Mission Moon Study

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या निर्मितीपासूनचा आतापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास समजून घेण्यासाठी आता चंद्राची मदत घेतली जाणार आहे. नासाच्या आगामी 'आर्टेमिस' मोहिमेद्वारे अंतराळवीर चंद्रावरील विवरांचा सखोल अभ्यास करणार आहेत, अशी माहिती नासाचे अंतराळवीर ख्रिस विल्यम्स यांनी दिली आहे.

चंद्रावरील विवरे सूर्यमालेत घडलेल्या प्राचीन आघातांचा जिवंत पुरावा

ख्रिस विल्यम्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "आर्टेमिस II टीम जेव्हा चंद्राच्या जवळ पोहोचेल, तेव्हा त्यांना चंद्राचा पृष्ठभाग अतिशय स्पष्टपणे आणि जवळून पाहता येईल. विशेषतः चंद्राच्या दूरच्या बाजूला असलेली विवरे ही लक्षवेधी आहेत. ती आपल्या सूर्यमालेत घडलेल्या प्राचीन आघातांचा जिवंत पुरावा आहेत. चंद्रावर वातावरणाचा अभाव असल्याने तिथे पृथ्वीसारखी झीज होत नाही. त्यामुळे ही विवरे आजही सुरक्षित असून, पृथ्वी आणि चंद्राच्या सभोवतालच्या प्राचीन परिस्थितीची एक प्रकारची 'ऐतिहासिक नोंद' म्हणून काम करत आहेत, असेही विल्यम्स यांनी स्पष्ट केले आहे.

NASA Artemis II Mission Moon
NASA Mission : पन्नास वर्षांनंतर 'नासा' पुन्हा चंद्रावर का जात आहे?

संशोधनातून मिळणार पृथ्वीच्या भूतकाळातील रंजक गोष्टींची माहिती

"पृथ्वीच्या इतिहासात अनेकदा मोठे उल्कापात किंवा आघात झाले आहेत, ज्याचे परिणाम आपल्या ग्रहावर खूप गंभीर झाले आहेत. उदाहरणादाखल डायनासोरचे नष्ट होणे आठवून पहा; पण पृथ्वीवर सतत होणारे बदल, वारा-पावसामुळे होणारी धूप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे या आघातांच्या जुन्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या जुन्या इतिहासाबद्दलची माहिती मिळत नाही. पण, चंद्रावर हे बदल होत नसल्याने तिथे आजही त्या जुन्या खुणा तशाच आहेत. म्हणूनच, चंद्राचा अभ्यास केल्यास आपल्याला आपल्या पृथ्वीच्या भूतकाळातील अनेक अनपेक्षित आणि रंजक गोष्टी समजण्यास मदत होईल!" असे विल्यम्स यांनी स्पष्ट केले आहे.

NASA Artemis II Mission Moon
Artemis 2 mission | ‘नासा’च्या ‘आर्टेमिस-2’ने सोडली पृथ्वीची कक्षा

पृथ्वीवरील विवरे चंद्रावरील विवरांसारखी स्पष्ट दिसत नाहीत

"पृथ्वीवरही काही विवरे आहेत, पण ती चंद्रावरील विवरांसारखी स्पष्ट दिसत नाहीत. मात्र, कॅनडातील 'मॅनिकोआगन' सारखे विवर अंतराळ स्थानकावरून सहज ओळखता येते. सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी ५ किलोमीटर आकाराचा एक लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याने हे ७० किलोमीटर रुंद विवर तयार झाले आहे. मी अंतराळात व्यायाम करत असताना जेव्हा खिडकीतून हे दृश्य पाहिले, तेव्हा मी इतका भारावून गेलो की, त्याचे फोटो घेण्यासाठी मला माझा व्यायाम मध्येच थांबवावा लागला!" असे विल्यम्स यांनी म्‍हटलं आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष वेधले 'आर्टेमिस' II कडे

"चंद्राचा प्रवास सोपा नसून तिथे विश्रांतीला फारसा वाव नसतो. अंतराळवीर क्रिस्टिना एच. कोच यांनी व्यायाम केल्यानंतर, उद्या होणाऱ्या चंद्राच्या 'लूनर फ्लायबाय' (चंद्राच्या अगदी जवळून जाणारे उड्डाण) मोहिमेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या 'आर्टेमिस II' मोहीम चंद्राच्या दिशेने झेपावत असून, संपूर्ण जगाचे लक्ष या ऐतिहासिक मोहिमेकडे लागले आहे."

NASA Artemis II Mission Moon
Artemis-2 mission | पृथ्वीच्या सौंदर्याने अंतराळवीर भारावले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news