Microsoft Windows | CrowdStrike Update - मायक्रोसॉफ्टच्या सेवा का झाल्या ठप्प? जाणून घ्या कारण

Blue Screen of Death (BSOD) म्हणजे काय?
Microsoft Windows | CrowdStrike Update
PUDHARI

पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सेवा ठप्प झाल्याने झाल्याने भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, युनायटेड किंगडमसह जगभरातील वापरकर्ते, बिझनेस यांना मोठा फटका बसला आहे. विमान आणि बँका यांच्या सेवाही ठप्प झाल्या आहेत. या आऊटेजमुळे युजर्सना त्यांच्या कॉम्प्युटरवर एक निळी स्क्रीन दिसत आहे, आणि सिस्टम आपोआप शटडाऊन होऊ लागलेली आहे.

जगभरात कॉम्प्युटर वापरासाठी सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम ही मायक्रोसॉफ्टची विंडोज ही आहे. ही ऑपरेटिंग सिस्टममध्ये आऊटेज धक्कादायक मानले जात आहे. दरम्यान काँप्युटर निर्मिती करणारी अग्रगण्य कंपनी डेल टेक्नॉलॉजी यांनी CrowdStrike मध्ये झालेल्या अपडेटमधील बिघाडामुळे विंडोज क्रॅश झाल्याचे म्हटले आहे. ही बातमी बिझनेस टुडेने दिलेली आहे.

अमेरिकेतील प्रमाण वेळेनुसार गुरुवारी सायंकाळी हे आऊटेज सुरू झाले. याचा पहिला फटका मध्य अमेरिकेत बसला. अमेरिकेतील अमेरिकन एअरलाईन्स, फ्रॉटिंअर एअरलाईन्स, सन कंट्री, भारतातील इंडिगो यांच्या सेवा ठप्प झाल्या.

Microsoft Windows | CrowdStrike Update नेमके काय घडले?

Summary
  • क्राऊडस्ट्राईक हा रिअलटाईम सिक्युरिटी देणारा प्लॅटफॉर्म आहे.

  • या प्लॅटफॉर्ममध्ये फाल्कन सेन्सर आहेत.

  • या सेन्सरमध्ये अपडेटमध्ये बिघाड राहिला.

  • त्यातून विंडोज सिस्टम आणि क्राऊडस्ट्राईमध्ये विरोधाभास उत्पन्न झाला, आणि मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प झाल्या

CrowdStrike म्हणजे काय? What is CrowdStrike?

CrowdStrike (काऊडस्ट्राईक) हा सायबर सिक्युरिटीशी संबंधित प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म युजर्स आणि बिझनेस यांना सिक्युरिटी सोल्युशन देते. काऊडस्ट्राईक सिंगल सेन्सरपद्धतीने रिअलटाईममध्ये सिक्युरिटी देते. क्राऊडस्टाईकमध्ये फाल्कन सेन्सर असतात. क्राऊडस्ट्राईकमध्ये एक अपडेट करण्यात आले होते, यातील उणिवामुळे फाल्कनस्ट्राईकच्या फाल्कन सेन्सरमध्ये बिघाड झाला. हा बिघाड विंडोच्या सिस्टमध्ये एकप्रकारे विरोधाभास निर्माण झाला आणि त्यातून या आऊटेजची स्थिती निर्माण झाली.

क्राऊडस्ट्राईकचे सीईओ जॉर्ज कुट्ज यांनी या त्रुटी मान्य केल्या आहेत. "आमचे इंजिनिअर तत्परतेने ही समस्या सोडवत आहेत. ही दुरुस्ती झाल्यानंतर वापरकर्त्यांना कळवण्यात येईल." तर मायक्रोसॉफ्टने Azure मधील त्रुटी शुक्रवारी सकाळी दूर केल्या असल्याचे सांगितले आहे.

Blue Screen of Death म्हणजे काय?

विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर गंभीर समस्या दाखवण्यासाठी निळी स्क्रीन दाखवली जाते. याला Blue Screen of Death (BSOD) असे म्हटले जाते. जेव्हा सुरक्षितरीत्या काम करण्यापासून सिस्टमला रोखणारी गंभीर समस्या निर्माण होते तेव्हा, ही स्क्रीन दिसते. त्यातून सिस्टम आपोआप रिस्टार्ट होते आणि सेव्ह न केलेला डेटा गमवावा लागतो.

Microsoft Windows | CrowdStrike Update
Microsoft outage Update | मायक्रोसॉफ्ट क्लाऊडमध्ये बिघाड; जगभरातील सेवा ठप्प

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news