Microsoft outage Update | मायक्रोसॉफ्ट क्लाऊडमध्ये बिघाड; जगभरातील सेवा ठप्प

विमानसेवेंसह, बँका आणि शेअरमार्केटवरही परिणाम
Microsoft outage Update
IT क्षेत्रातील २०२४ मधील मोठं संकंट; मायक्रोसॉफटच्या सर्व्हरमध्ये बिघाडFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: मायक्रोसॉफटच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने भारत, यूएस आणि ऑस्ट्रेलियामधील अनेक कंपन्या, एअरलाइन्स, बँका, प्रसारमाध्यमे आणि सरकारी कार्यालयांवर त्याचा परिणाम झाला आहे. हे IT क्षेत्रातील २०२४ मधील सर्वात मोठं संकंट असल्याचे अनेक आयटी तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Microsoft 365 ॲप्स, सेवांमध्ये प्रवेश करण्यास अडथळा

जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजचे वापरकर्ते सध्या "ब्लू स्क्रीन ऑफ डेथ" (BSOD) त्रुटी अनुभवत आहेत. ज्यामुळे त्यांची प्रणाली अचानक बंद किंवा रीस्टार्ट होत आहे. जागतिक सायबर सुरक्षा फर्म CrowdStrike मधील अलीकडील अपडेटमुळे मायक्रोसॉफ्टला या संकंटाचा सामना करावा लागत आहे. त्रुटीमुळे वापरकर्ते विविध Microsoft 365 ॲप्स आणि सेवांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत, असेही आयटी तज्ज्ञांनी म्हटले आहे.

स्काय न्यूज नेटवर्क माध्यम सेवा पूर्णपणे ठप्प

बँकांपासून ते विमानतळ आणि माध्यमांपर्यंत, जगभरातील अनेक ऑनलाइन सेवांना मोठ्या प्रमाणावर आउटेजचा फटका बसला आहे. यूएसपासून यूके, भारतापर्यंत आयटी आउटेजमुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. विमानतळांवरील चेक-इन सिस्टम क्रॅश झाल्यामुळे जगभरात अनेक फ्लाइट्स स्थगित करण्यात आल्या आहेत. तर यूकेमधील स्काय न्यूज नेटवर्क ही माध्यमसेवा पूर्णपणे बंद झाल्याचेही माध्यमांनी वृत्तात म्हटले आहे.

Microsoft ने काही सेवा पुनर्संचयित केल्या

Microsoft ने Microsoft Defender, Intune, OneNote, आणि SharePoint Online सारख्या काही सेवा पुनर्संचयित केल्या आहेत परंतु काही साधने अद्याप बंद आहेत, असे हिंदुस्थान टाइम्सने वृत्तात म्हटले आहे.

'हा' सायबर हल्ला आहे का?

मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे जगभरातील ब्रॉडकास्टर्स, बँका आणि टेलिकॉम कंपन्यांवर परिणाम झाला. या जागतिक आयटी आउटेजला सायबर समस्या म्हणून हाताळले जात नाही, असे ब्रिटीश सरकारच्या सुरक्षा स्त्रोताने रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news