Jordan Church Shooting: जॉर्डनमधील चर्चमध्ये दोन अज्ञातांचा गोळीबार; ६ जण ठार तर २८ जण जखमी

जॉर्डनमधील कराक भागातील चर्चमध्ये एक अंत्यविधी सुरू असताना दोन अज्ञातांनी गोळीबार केला.
Jordan Church Shooting
Jordan Church Shootingpudhari
Published on: 
Updated on: 

Jordan Church Shooting: जॉर्डनमधील कराक भागातील चर्चमध्ये एक अंत्यविधी सुरू असताना दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात आतापर्यंत ६ लोकांचा जीव गेला आहे तर २८ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या सूत्रांकडून अज्ञात हल्लेखोर गाडीतून आले अन् त्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की या हल्लेखोरांनी ५ मनिटे सलग गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Jordan Church Shooting
Thane Church Land Case: नऊ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर अखेर न्याय : सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टची जमीन मूळ मालकांकडे परत

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की एका हल्लेखोराकडे एके ४७ रायफल होती. हा हल्ला कारक येथील ग्रीक अर्थोडॉक्स चर्चवर झाला. हे ठिकाण जॉर्डनची राजधानी अम्मान पासून १८० किलोमीटर लांब आहे. कराक हे अल्पसंख्यांक ख्रिश्चन समुदायाचे घर मानले जाते.

Jordan Church Shooting
Porvorim Shooting Case | पर्वरी गोळीबार प्रकरण: मुख्य संशयित गोपाळ नाईक फरारी; क्राइम ब्रँचची पथके इतर राज्यांत रवाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news