Porvorim Shooting Case | पर्वरी गोळीबार प्रकरण: मुख्य संशयित गोपाळ नाईक फरारी; क्राइम ब्रँचची पथके इतर राज्यांत रवाना

Porvorim Shooting Case | पर्वरी गोळीबार प्रकरण ; शेजारील राज्यात क्राइम ब्रँच पोलिस पथके रवाना
shooting case
shooting casePudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील संशयित गोपाळ नाईक फरारी झाला आहे. क्राइम ब्रँचचे पोलिस त्याच्या मागावर आहेत. शेजारील राज्यात पथके पाठवण्यात आली आहेत. कॅसिनो व्यावसायिक सतीश शिंदे याने दिलेल्या जबाबातून त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

shooting case
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

हा हल्ला कॅसिनो व्यवसायाशी संबंधित असलेल्या प्रकरणातूनच झाला असून, त्याची साखळी मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत सात संशयितांना या गोळीबार प्रकरणात क्राइम ब्रँचने अटक केली आहे.

यामध्ये शूटर्स संशयित अपुर्थराज उर्फ अण्णा नडार व बाबू अली, संशयित पवन सौर, काझू शेख, इसार अली व सूरज आचार्य तसेच कॅसिनो व्यावसायिक सतीश शिंदे याच्या समावेश आहे. संशयित काझू शेख, इसार अली व सूरज आचार्य या तिघांची पोलिस कोठडी उद्या संपत असल्याने मंगळवारी २२ सप्टेंबरला न्यायालयात उभे केले जाणार आहे.

shooting case
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

नायक यांचा पोलिस संरक्षणासाठी अर्ज

पर्वरी गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार, तसेच ठार मारण्याची सुपारी दिलेले अजूनही मोकळे असल्याने निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांनी पोलिस संरक्षण मागितले आहे. स्वतःचा अंगरक्षक असूनही त्यांच्या जीवाला धोका असल्याने संरक्षण देण्याची विनंती पोलिसांना केली आहे. त्यासंदर्भाचा निर्णय गोवा पोलिस सध्याची परिस्थिती पाहून घेणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news