Thane Church Land Case: नऊ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर अखेर न्याय : सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टची जमीन मूळ मालकांकडे परत

ठाणे सिटीझन्स फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णायक आदेश
Thane Church Land Case
Thane Church Land CasePudhari File Photo
Published on
Updated on

ठाणे : सतत नऊ वर्षे चाललेल्या कठोर कायदेशीर लढ्यानंतर सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्ट यांच्या मालकीची जमीन अखेर मालकांकडे परत देण्यात आली. यासंदर्भात ठाणे सिटीझन्स फाउंडेशनने तब्बल नऊ वर्ष कायदेशीर लढाई लढून यासंदर्भात पाठपुरावा केला होता. अखेर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन परत देण्याचा महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे नऊ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ही जमीन ताब्यात आली असून ठाणे सिटीझन्स फाउंडेशनच्या लढ्याला देखील यश आले आहे.

Thane Church Land Case
Union Budget 2026: कोकणासाठी विकासाचा महासंकल्प; कृषी-मत्स्य-रेल्वे-बंदरांना ऐतिहासिक चालना

सदरची ही जमीन सेक्टर क्रमांक 4, खेळाचे मैदान क्रमांक 7, माजीवाडा, ठाणे येथील र्वे नंबर 188, 189/2 आणि 192/3/ मध्ये येते.जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे लक्षात येताच, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टने औपचारिक तक्रार दाखल करून ही जमीन वाचवण्यासाठी कायदेशीर लढा लढण्याची विनंती ठाणे सिटीझन्स फाउंडेशनकडे केली होती. त्यानंतर ठाणे सिटीझन्स फाउंडेशनने ही जबाबदारी स्वीकारून विविध कायदेशीर मंचांवर हा लढा सातत्याने पुढे नेला. सन 2017 मध्ये, हिरानंदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सर्वे नंबरमधील गंभीर तफावत दूर न करता,

Thane Church Land Case
Urun transport problems : उरण आगाराने एसटी गाड्यांची संख्या वाढवावी

अनिवार्य टी एल आर सर्वेक्षण न करता,खेळाच्या मैदानाच्या अंतिम सीमांकनाची खात्री न करता, संपूर्ण 20,570 चौ. मी. जमीन ठाणे महानगरपालिकेच्या नावावर बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याचे फाउंडेशनचे म्हणणे होते. सुरुवातीला 20,570 चौ. मी. जमीन घेतल्यानंतर, ठाणे महानगरपालिकेने आपला केवळ 10,130.49 चौ. मी. चा दावा असल्याचे सांगितले, ज्यामुळे संपूर्ण व्यवहारातील गंभीर विसंगती, प्रक्रियात्मक त्रुटी आणि अनियमितता उघडकीस आल्या. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, ठाणे महानगरपालिकेच्या नावावर बेकायदेशीररीत्या हस्तांतरित करण्यात आलेल्या 20,570 चौ. मी. जमिनीपैकी सुमारे 900 चौ. मी. जमीन हिरानंदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी कोणतीही परवानगी, अधिकार किंवा कायदेशीर मान्यता नसताना आदित्य बिल्डर्स यांना विकली असल्याचा फाउंडेशनचा आरोप आहे .

Thane Church Land Case
Biodiversity of Tala : तळ्यातील रस्त्याच्या कडेला, जंगल भागात बहरला ‌‘पळस‌’

ही 900 चौ. मी. जमीन सर्वे नंबर 189 मधील असून ती ट्रस्टच्या निवासी (रहिवासी ) क्षेत्रात येत होती, जी कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरित करता येण्याजोगी नव्हती. ही विक्री पूर्णपणे बेकायदेशीर, आणि महसूल कायद्यांचे उघड उल्लंघन असल्याचे फाउंडेशनचे म्हणणे होते. या सर्व बेकायदेशीर कृतींचा थेट परिणाम ट्रस्टची अतिरिक्त जमीन चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करून हस्तांतरित करण्यात आली, ज्याचा फटका लिटिल फ्लॉवर हायस्कूल आणि आवर लेडी ऑफ मर्सी चर्चच्या पॅरिशनर्स यांना बसला. परिणामी मुलांच्या शिक्षण, खेळ, सुरक्षितता आणि समाजोपयोगी खुल्या जागांवर गंभीर परिणाम झाला, ज्याचे दीर्घकालीन सामाजिक दुष्परिणाम झाले.

Thane Church Land Case
Raigad Zilla Parishad Elections : जि.प. निवडणूक शांततेत होण्याकरिता पोलीस सज्ज

विलंब झाला मात्र न्याय मिळाला

ट्रस्टच्या तक्रारीवर कारवाई करत, ठाणे सिटीझन्स फाउंडेशनने हा विषय उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी (अपिलीय प्राधिकरण), मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, तसेच राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग यांच्यासमोर सातत्याने मांडला. अखेर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम व निर्णायक आदेश देत जमीन ट्रस्टकडे परत देण्याचे निर्देश दिले आणि संपूर्ण बेकायदेशीर हस्तांतरण रद्द ठरवले. या आदेशानुसार, 30 जानेवारी 2026 रोजी, ठाणे तहसीलदार, तलाठी आणि माजीवाडा येथील मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर) यांनी जमीन नोंदींची अंतिम फेरफार व नोंदणी पूर्ण केली. त्यानुसार नवीन 7/12 उतारे व फेरफार नोंदी तयार करण्यात आल्या, ज्यामध्ये पुन्हा एकदा सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टचे नाव कायदेशीर व योग्य मालक म्हणून नोंदवण्यात आले असल्याची माहिती कॅस्बर ऑगस्टीन यांनी दिली आहे. तर ‌‘बेकायदेशीर जमीन हस्तांतरण, अधिकारांचा गैरवापर असे प्रकार करूनही आम्ही प्रामाणिकपणे कायदेशीर लढाई लढली. शेवटी व्यक्ती कितीही मोठी असली तरी, कायद्याच्या पुढे कोणीच नाही त्यामुळे विलंब झाला मात्र न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कायदेशीर लढाई लढणारे ऍड.अमोल पाटील यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news