

Jeff Bezos Lauren Sanchez Venice wedding controversy Protests backlash Venice Mayor welcome
व्हेनिस (इटली) : अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझोस आणि त्यांची सखी लॉरेन सांचेज यांच्या भव्य विवाह सोहळ्यावरून ऐतिहासिक शहर व्हेनिसमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात प्रचंड खर्चाच्या या विवाह सोहळ्याला विरोध करत नागरिक रस्त्यावर उतरले असून, "No Space For Bezos" असा मोठा फलक शहरातील सुप्रसिद्ध बेल टॉवरवर झळकवण्यात आला आहे.
व्हेनिसचे महापौर लुईजी ब्रुज्ञानो यांनी मात्र स्थानिकांच्या या निषेधाला मूर्खपणा ठरवत बेझोस यांचे खुलेपणाने स्वागत केले पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले. “माझ्यामते अशा प्रकारच्या निषेधाने आपण लज्जास्पद वर्तन करत आहोत. बेझोस हे आपल्या शहराला प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवून देणारे आहेत,” असे त्यांनी म्हटले.
“आपण बेझोसची माफी मागावी लागेल. सगळे व्हेनिसवासी अशा निषेध करणाऱ्यांप्रमाणे विचार करत नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेझोस-सांचेज यांचा लग्नसोहळा 10 मिलियन डॉलर्स (सुमारे 83 कोटी रुपये) खर्चाचा असून, विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होतील, यामध्ये सॅन जॉर्जिओ मॅजिओरे बेट याचा समावेश आहे.
नागरिक यासाठी निषेध करताहेत की, व्हेनिसमध्ये आधीच अतिपर्यटन (overtourism) मुळे स्थानिक जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. सरकारी प्रयत्नांमुळे आठवड्याच्या शेवटी आणि सुट्यांमध्ये पर्यटकांकडून 10 युरो शुल्क घेतले जाते.
पण यामुळे शाळा, रुग्णालये व परवडणारी घरे कमी होत चालली आहेत आणि स्थानिकांचे जगणे कठीण झाले आहे.
"व्हेनिस केवळ पोस्टकार्डवर छापले गेलेले विवाहस्थळ म्हणून नाही, तर बहुश्रुत श्रीमंतांपुढे न झुकणारे शहर म्हणून ओळखले गेले पाहिजे", असे आंदोलकांचे म्हणणे आहे. विवाहसोहळा उधळून लावण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
आंदोलनकर्ते लग्नाच्या वेळी कालवे आणि रस्ते अडवण्याची योजना करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, असे भव्य कार्यक्रम तात्पुरते रोजगार निर्माण करतात, पण शहरासाठी फार काही टिकवून ठेवत नाहीत. तसेच, बेझोस यांची 500 मिलियन डॉलर्सची 'कोरु' सुपरयॉट हे देखील संतापाचे कारण बनले आहे.
तथापि, सर्वचजण निषेधाला पाठिंबा देत नाही आहेत. परदेशांमधून व्हेनिसमध्ये आलेले अनेकजण या विवाहाला पाठिंबाही देत आहेत. “व्हेनिससारखे शहर जे पर्यटनावर जगते, त्यांनी असा मोठा विवाह कार्यक्रम होऊ दिला पाहिजे. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो." असे काहींचे मत आहे. तर
व्हेनिसमध्ये राहणाऱ्या अमेरिकन ट्रॅव्हल लेखक गिलियन मॅकगायर यांनी असे म्हटले की, "शतकानुशतके प्रसिद्ध लोक व्हेनिसमध्ये लग्न करत आले आहेत. व्हेनिस नेहमीच जगाच्या संस्कृतींचा संगमबिंदू राहिले आहे. एका लग्नामुळे हे शहर बदलणार नाही."
फोर्ब्जच्या माहितीनुसार जेफ बेझोस यांची जून 2025 पर्यंतची नेटवर्थ सुमारे 227 अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी 1994 मध्ये Amazon कंपनी सुरू केली होती. 2021 मध्ये त्यांनी Amazon चे CEO पद सोडले, पण कंपनीत त्यांचा मोठा हिस्सा अजूनही आहे. त्यांनी Blue Origin नावाची एरोस्पेस कंपनी सुरू केली आहे आणि The Washington Post या प्रसिद्ध वृत्तपत्राचीही मालकी त्यांच्याकडे आहे.
लॉरेन सांचेझ या एक अमेरिकन मीडिया पर्सनॅलिटी, टीव्ही अँकर, हेलिकॉप्टर पायलट आणि उद्योजिका आहेत. त्यांनी हवाई चित्रीकरणासाठी स्वतःची कंपनी स्थापन केली आहे: Black Ops Aviation, जी एका महिला स्थापकाने स्थापन केलेली पहिली एरियल फिल्म कंपनी मानली जाते.
याआधी त्यांनी प्रसिद्ध टॅलेंट एजंट पॅट्रिक व्हाईटसेल यांच्याशी विवाह केला होता, त्यांना काही मुलं आहेत. 2019 मध्ये जेफ बेझोस यांच्यासोबत त्यांचे नातं सार्वजनिक झाले. बेझोसने पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर लॉरेनसोबतचे संबंध समोर आले. 2023 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि आता 2025 मध्ये व्हेनिसमध्ये लग्न होत आहे.