Delhi to Bali flight return | दिल्लीहून बालीकडे निघाले होते विमान, ज्वालामुखीचा उद्रेक झाला अन् घेतला यु टर्न, 11 किमी उंच राखेचा ढग

Air India Delhi to Bali flight return | बाली येथे Mount Lewotobi वर ज्वालामुखीचे तांडव, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला ब्रेक
flight vocano
flight vocano Pudhari
Published on
Updated on

Air India Delhi to Bali flight return AI2145 Flight Bali airport closed Mount Lewotobi eruption ash cloud Emergency flight diversion

नवी दिल्ली : इंडोनेशियातील बाली येथील विमानतळाजवळील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दिल्लीहून बालीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला सुरक्षा कारणास्तव परत बोलावण्यात आले आहे. हे विमान AI2145 बुधवार, 18 जून रोजी दिल्लीहून बालीकडे निघाले होते.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, "ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे विमानाला परत दिल्लीमध्ये सुरक्षितरित्या उतरवण्यात आले असून, सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले आहे."

प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांची हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, पूर्ण परतावा किंवा मोफत पुढील प्रवासासाठी पुनर्नियोजनाचा पर्याय दिला गेला आहे, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले.

माउंट लेवोटोबी लकी-लकीचा भीषण उद्रेक

बालीजवळील माउंट लेवोटोबी लकी-लकी या ज्वालामुखीचा मंगळवारी जोरदार उद्रेक झाला होता. यामुळे आकाशात जवळपास 11 किमी उंच राखेचे जाळे पसरले होते. इंडोनेशियाच्या ज्वालामुखी निरीक्षण संस्थेने या ज्वालामुखीचा अलर्ट पातळी सर्वात धोकादायक म्हणजेच ‘लेव्हल 4’ वर नेली आहे.

बुधवारी पुन्हा सकाळी याच ज्वालामुखीने सुमारे 1 किमी उंच राखेचे ढग हवेत फेकले. यामुळे पूर्व नुसा तेंगारा प्रांतातील मऊमेरे विमानतळ पूर्णतः बंद करण्यात आला.

flight vocano
July 5 tsunami prediction | 5 जुलैला महात्सुनामी येणार? 'जपानी बाबा वेंगा'च्या भविष्यवाणीने खळबळ, 2011 पेक्षा 3 पट मोठी त्सुनामी?

अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

या ज्वालामुखीच्या प्रभावामुळे बालीकडे जाणारी आणि येणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे – विशेषतः भारत, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया येथून येणारी – रद्द करण्यात आली आहेत. बाली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वेबसाइटवर याची पुष्टी झाली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय

प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत एअर इंडियाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. बालीत अलीकडेच एका ऑस्ट्रेलियन पर्यटकाच्या हत्या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आल्याचेही स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे.

flight vocano
China nuclear arsenal SIPRI Report | धोक्याची घंटा! चीन अण्वस्त्रांची संख्या 1500 वर नेणार; काही अण्वस्त्रे 'लाँच-रेडी' स्थितीत...

नागरिकांचे स्थलांतर

Mount Lewotobi Laki-Laki नावाचा हा 1584 मीटर उंचीचा जुळा-शिखर असलेला ज्वालामुखी आहे, जो Flores या पर्यटकप्रिय बेटावर स्थित आहे. 5.35 वाजता (स्थानिक वेळेनुसार) या ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

Newsweek च्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा लावा वाहू शकतो, अशी शक्यता लक्षात घेता शेकडो रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाहर (lahar) नावाच्या धोकादायक चिखल प्रवाहांची शक्यता आहे – विशेषतः जोरदार पाऊस झाल्यास. हा लाहर प्रवाह म्हणजे लाव्हा, खडक व राखेचा घातक पूर असतो.

flight vocano
China rare earth export ban | चीनच्या बंदीमुळे भारतीय EV क्षेत्र अडचणीत; महिनाभरात बिघडू शकते इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचे गणित...

पुरूष आणि स्त्री डोंगर

नोव्हेंबर 2024 मध्ये देखील या ज्वालामुखीचा अनेक वेळा उद्रेक झाला होता. त्या उद्रेकात 9 जणांचा मृत्यू झाला होता, हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते.

Lewotobi Laki-Laki या नावाचा अर्थ इंडोनेशियन भाषेत "पुरुष" असा होतो. या ज्वालामुखीचे जुळे शिखर म्हणजे Perempuan (स्त्री) नावाचा, 1703 मीटर उंचीचा पण तुलनेने शांत ज्वालामुखी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news