World's Best Airline 2025 | सलग दुसऱ्यांदा जगात सर्वोत्तम ठरली आशियातील 'ही' एअरलाईन कंपनी, जाणून घ्या जगातील टॉप 10 एअरलाईन्स...

World's Best Airline 2025 | ‘एव्हिएशन ऑस्कर’चा मान सलग दुसऱ्यांदा मिळवणारी एकमेव विमानसेवा, 9 वेळा मिळवला जगातील सर्वोच्च किताब!
World's Best Airline 2025
World's Best Airline 2025Pudhari
Published on
Updated on

Qatar airline World's Best Airline 2025 Skytrax Awards Aviation Oscars 5-Star Recognition Best Business Class Most Trusted Airline

पॅरिस/लंडन : आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्ड्स 2025 मध्ये कतार एअरवेजला ‘वर्ल्ड्स बेस्ट एअरलाईन’ म्हणून गौरवण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी हा किताब पटकावत कतार एअरवेजने आता एकूण 9 व्यांदा हा बहुमान मिळवला असून, हे स्कायट्रॅक्स पुरस्कारांच्या 26 वर्षांच्या इतिहासातील एक विक्रम ठरला आहे.

इतर पुरस्कारांनी गौरव...

या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पॅरिस एअर शोमधील एअर अँड स्पेस म्युझियम येथे, भव्य आर्ट डेको हॉल ऑफ एट कॉलम्स मध्ये करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कतार एअरवेजला ‘मिडल ईस्टमधील सर्वोत्तम विमानसेवा’, ‘जगातील सर्वोत्तम बिझनेस क्लास’ आणि ‘सर्वोत्तम बिझनेस क्लास लाऊंज’ या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.

World's Best Airline 2025
Delhi to Bali flight return | दिल्लीहून बालीकडे निघाले होते विमान, ज्वालामुखीचा उद्रेक झाला अन् घेतला यु टर्न, 11 किमी उंच राखेचा ढग

कतार एअरवेजविषयी...

कतर एअरवेजची स्थापना 1993 मध्ये झाली होती. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी बोईंगसोबत ऐतिहासिक करार करत 210 वाईडबॉडी विमानांची ऑर्डर दिली असून, त्यात 130 ड्रीमलाईनर्स आणि 30 बोईंग 777-9 विमानांचा समावेश आहे.

कतार एअरवेज समूहाचे CEO बद्र मोहम्मद अल-मीर यांनी या गौरवाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “हा पुरस्कार आमच्यासाठी केवळ एक मानचिन्ह नाही, तर आमच्या अचूकतेची, प्रेरणादायी सेवा देण्याच्या हेतूची आणि आमच्या कर्मचार्‍यांच्या समर्पणाची पावती आहे.

5-स्टार एअरलाईन म्हणून सातत्याने ओळख मिळणे म्हणजे आमच्या दर्जेदार सेवेला ग्राहकांनी दिलेले अभूतपूर्व विश्वासच आहे.”

World's Best Airline 2025
China nuclear arsenal SIPRI Report | धोक्याची घंटा! चीन अण्वस्त्रांची संख्या 1500 वर नेणार; काही अण्वस्त्रे 'लाँच-रेडी' स्थितीत...

सर्वोत्तम टॉप 10 एअरलाईन्स – 2025

  1. कतार एअरवेज (Qatar Airways)

  2. सिंगापूर एअरलाईन्स (Singapore Airlines)

  3. कॅथे पॅसिफिक (Cathay Pacific)

  4. एमिरेट्स (Emirates – दुबई)

  5. एएनए ऑल निप्पॉन एअरवेज (ANA All Nippon Airways – जपान)

  6. तुर्किश एअरलाईन्स (Turkish Airlines)

  7. कोरियन एअर (Korean Air)

  8. एअर फ्रान्स (Air France)

  9. जपान एअरलाईन्स (Japan Airlines)

  10. हैनान एअरलाईन्स (Hainan Airlines – चीन)

सिंगापूर एअरलाई्न्सचाही गौरव...

सिंगापूर एअरलाईन्स या यादीत दुसऱ्या स्थानावर असून तिला ‘एशियातील सर्वोत्तम एअरलाइन’, ‘जगातील सर्वोत्तम केबिन क्रू’ आणि ‘सर्वोत्तम फर्स्ट क्लास’ या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. सिंगापूर एअरलाईन्सने आतापर्यंत पाच वेळा जागतिक सर्वोत्तम एअरलाइनचा किताब मिळवला आहे.

World's Best Airline 2025
July 5 tsunami prediction | 5 जुलैला महात्सुनामी येणार? 'जपानी बाबा वेंगा'च्या भविष्यवाणीने खळबळ, 2011 पेक्षा 3 पट मोठी त्सुनामी?

टॉप 20 मध्ये या कंपन्यांनीही मिळवले स्थान

स्वीस इंटरनॅशनल एअरलाईन्स, ब्रिटिश एअरवेज, कांटास (Qantas), व्हर्जिन अटलांटिक, लुफ्थांसा, एअर कॅनडा, स्टारलक्स एअरलाईन्स (STARLUX), EVA Air, सौदिया आणि आयबेरिया यांनीही टॉप 20 मध्ये स्थान मिळवले आहे.

भारतीय कंपन्यांची गतवर्षीची स्थिती

गतवर्षी स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्ड्स 2024 मध्ये भारतातील विस्तारा या एअरलाईन्सने सलग दुसऱ्यांदा टॉप 20 मध्ये स्थान मिळवत 16 वा क्रमांक पटकावला होता. तर इंडिगो 52 व्या आणि एअर इंडिया 90 व्या स्थानी होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news