Israel attack on Iran: इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारताची धाकधूक वाढली! आपल्या नागरिकांसाठी दिल्या तातडीच्या सूचना

India advisory for citizens in Israel: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर भारताने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
Israel attack on Iran
Israel attack on Iranfile photo
Published on
Updated on

Israel attack on Iran

नवी दिल्ली: इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणवर दिवसाढवळ्या प्रतिबंधात्मक हल्ला केला आहे. तेहरानमध्ये मोठ-मोठे स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ हा हल्ला झाला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर भारताने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

Israel attack on Iran
Afghanistan captured Pak Pilot: अफगाणिस्तानचा करारा जवाब; पाकचं अजून एक फायटर जेट पाडलंच, पायलटलाही जिवंत पकडलं?

इस्राईल मधील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपले निवासस्थान किंवा कार्यस्थळाजवळील सुरक्षित आश्रयस्थळांची माहिती करून घ्यावी आणि शक्यतो त्यांच्याजवळच राहावे. पुढील आदेश येईपर्यंत इस्रायलमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासाशी संपर्कात राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.

तेहरानमध्ये स्फोट; आकाशात धुराचे लोट पसरले, नेमकं काय घडलं?

इस्रायलने इराण विरोधात संभाव्य धोक्याला आळा घालण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केल्याची माहिती इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. या कारवाईनंतर इस्रायलने देशभरातील नागरिकांसाठी अलर्ट जारी करत सायरन वाजवले, जेणेकरून संभाव्य प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोक सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतील.

दरम्यान, इराणची राजधानी तेहरान येथे जोरदार स्फोट झाल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत. राजधानीच्या मध्यवर्ती भागात किमान तीन स्फोट ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, इराणी अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृतरीत्या हल्ल्याची माहिती दिली नाही किंवा नुकसानाबाबत तपशील दिलेला नाही.

Israel attack on Iran
Plane Crash: नोटा घेऊन जाणारं विमान थेट रस्त्यावर कोसळलं! १५ जणांचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news