Plane Crash: नोटा घेऊन जाणारं विमान थेट रस्त्यावर कोसळलं! १५ जणांचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा!

Bolivia Air Force plane crash: वायुसेनेचे 'हर्क्युलिस सी-१३०' हे महाकाय विमान नवीन चलनी नोटा घेऊन जात असतान अपघात झाला.
Bolivia Air Force plane crash
Bolivia Air Force plane crashfile photo
Published on
Updated on

Bolivia Air Force plane crash:

बोलीव्हिया: दक्षिण अमेरिकेतील बोलीव्हिया देशात शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. बोलीव्हियन वायुसेनेचे 'हर्क्युलिस सी-१३०' हे महाकाय विमान एल अल्टो शहरात धावपट्टीवरून घसरून थेट रहदारीच्या रस्त्यावर कोसळले. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे विमान नवीन चलनी नोटा घेऊन जात असल्याने अपघातानंतर रस्त्यावर नोटांचा खच पडला होता.

Bolivia Air Force plane crash
Pakistan-Afghanistan War: विनाशाला सुरूवात? पाकिस्तानच्या 'ऑपरेशन गजब-लील-हक' चा खरा अर्थ काय?

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. विमान धावपट्टीवरून उड्डाण करत असताना किंवा लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे घसरले. वेगावर नियंत्रण न राहिल्याने विमानाने विमानतळाची सुरक्षा भिंत तोडली आणि ते थेट बाहेरील मुख्य रस्त्यावर आले.

रस्त्यावरील वाहनांना विमानाची धडक

विमान रस्त्यावर कोसळल्यानंतर तेथून जाणाऱ्या अनेक कार आणि इतर वाहनांना त्याची जोरदार धडक बसली. यामुळे अनेक वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघाताचे थरकाप उडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रस्त्यावर नोटांची पाकिटे

हे विमान देशाच्या इतर भागांत वितरणासाठी नवीन चलनी नोटा घेऊन जात होते. विमानाचा अपघात होताच त्यातील नोटांची पाकिटे फाटली आणि हजारो नोटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांनी जीव गमावला आहे, तर ३० जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बोलीव्हियन पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. खबरदारीचा उपाय म्हणून 'एल अल्टो' विमानतळ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news