Afghanistan captured Pak Pilot: अफगाणिस्तानचा करारा जवाब; पाकचं अजून एक फायटर जेट पाडलंच, पायलटलाही जिवंत पकडलं?

Afghanistan captured Pak Pilot
Afghanistan captured Pak Pilotpudhari photo
Published on
Updated on

Afghanistan captured Pak Pilot: पाकिस्तान - अफगाणिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष आता वाढला असून दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले करणे सुरूच आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानात पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केला. मात्र या एअर स्ट्राईकदरम्यान, अफगाणिस्तान तालिबानच्या सैन्याला मोठं यश मिळाल्याचा दावा केला जात आहे.

Afghanistan captured Pak Pilot
Trump On Pakistan Afghanistan War: मी मध्यस्थी करतो मात्र... अफगाण - पाकिस्तान खुल्या युद्धात ट्रम्प कोणाच्या बाजूने?

अफगाण सुरक्षा दलांकडून पाकिस्तानी जेट पाडल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानचे जेट नानगरहर भागात पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच अफगाण सैन्यानं पाकिस्तानच्या एका पायलटला देखली जिवंत पकडल्याचा दावा केला आहे.

Afghanistan captured Pak Pilot
Pakistan Semi Final scenario: 'कुदरत का निजाम' म्हणणाऱ्या पाकिस्तानचे लंकेत होणार दहन...? असं असेल NRR चं अवघड समीकरण

लष्करी संघर्ष झाला तीव्र

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षात दोन्ही देशांचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्ताननं २०० पेक्षा जास्त तालिबानी सैनिक मारल्याचा दवा केला आहे तर अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या डझनभर चौक्या ताब्यात घेतल्या असून ५५ पाकिस्तानी सैनिक ठार केल्याचा दावा केला होता. त्यातच अनेक पाकिस्तानी सैनिक हे अफगाणिस्ताननं पकडले असल्याचा दावा देखील तालिबान अफगाणिस्ताननं केला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानचे एफ १६ फायटर जेट देखील पाडल्याचा दावा केला होता. याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

Afghanistan captured Pak Pilot
Afghanistan Pakistan Conflict: अफगाणिस्तान युद्धामुळं पाकिस्तानचे तुकडे होणार? BLA च्या हल्ल्यांनीही पाक लष्कर हैराण

पाकिस्तानची नाचक्की

दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कंदहार, काबुल सारख्या महत्वाच्या ठिकाणी एअर स्ट्राईक करणं सुरूच ठेवलं आहे. मात्र आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानचं अजून एक फायटर जेट पाडल्याचा आणि पायलटला जिवंत पकडल्याचा दावा केला आहे. हा पाकिस्तानी लष्करासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

लष्करी पातळीवर पाहिलं तर पाकिस्तान हा अफगाणिस्तानपेक्षा कित्येक पटीनं सक्षम आणि तांत्रज्ञानाच्या दृष्टीकोणातून बलाढ्य आहे. मात्र अफगाणिस्ताननं या बलाढ्य पाकिस्तानची आतापर्यंत दोन फायटर जेट पाडली असतील तर तो पाकिस्तानसाठी एक मोठा सेटबॅक मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news