Israel-Hamas War : इस्रायल-‘हमास’ युद्धात 3,800 बळी

Israel-Hamas War : इस्रायल-‘हमास’ युद्धात 3,800 बळी

तेल अवीव; वृत्तसंस्था :  इस्रायल-'हमास' युद्धात आतापर्यंत 3,800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 'हमास'सोबतच्या युद्धाचा दहावा दिवस सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टीतील 2,400 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागरिकांसह दहशतवाद्यांचाही समावेश आहे; तर 'हमास'च्या हल्ल्यात 1,400 हून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. (Israel-Hamas War)

संबंधित बातम्या :

इस्रायलच्या 199 नागरिकांना 'हमास'ने ओलीस ठेवले असून, यामध्ये बालकांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ओलिसांना गाझापासून दूरवर अज्ञात ठिकाणी ठेवले आहे. इस्रायलने हल्ले वाढविल्यानंतर 'हमास'ने शरणागती पत्कारली असून, ओलिसांना सोडण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे. इराणने ओलिसांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतल्याचे समजते. ओलिसांच्या सुटकेसाठी गाझापट्टीवरील हल्ले थांबविण्याची अट इस्रायलला घालण्यात आल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, गाझापट्टीवरील 'हमास'च्या लष्करीतळावर इस्रायली सैन्यदलाने हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. 10 दिवसांत 'हमास'च्या 6 कमांडरना यमसदनी पाठविण्यात आले असून, प्रमुख दहशतवादी तळ नेस्तनाबूत करण्यात आले आहेत. (Israel-Hamas War)

24 तासांत 'हमास'च्या 250 तळांवर हल्ले

मुएजात ईद या 'हमास'च्या कमांडरला कंठस्नान घालण्यास इस्रायलला यश आले आहे. गेल्या 24 तासांत 'हमास'च्या 250 तळांवर हवाई हल्ले करून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. बिलाल अल केदरा,अली कादी, मुराद अबू मुरादसह अन्य कमांडरही या हल्ल्यात ठार झाले आहेत.

अमेरिका, भारत, युरोपिय देश इस्रायलसोबत; रशिया, इराण, इराक पॅलेस्टाईनच्या पाठीशी

अमेरिका, भारत, युरोपिय देशांचा इस्रायलला पाठिंबा आहे. रशिया, इराण, इराक, लेबनॉनसह अन्य मुस्लिम देशांनी पॅलेस्टाईनला समर्थन दिले आहे. जी-20 परिषदेतील संसदीय अध्यक्षांच्या बैठकीमध्येही 'हमास'च्या दहशतवादी कृत्याचा निषेध करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचे स्पष्ट करून अशाप्रकारचे कृत्य कदापिही सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे. (Israel-Hamas War)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news