Israel Hamas War : इस्रायली हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार; ४ ओलिसांची सुटका

Israel-Hamas War
Israel-Hamas War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायली हल्ल्यात डझनभर मुलांसह किमान २७४ पॅलेस्टिनी ठार झाले आणि शेकडो जण जखमी झाले, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांच्या सैन्याने जोरदार गोळीबार केला. हमासच्या ताब्यात असलेल्या चार ओलिसांना वाचवण्यात आले. दरम्यान, याआधी गाझाचे एक आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले होते की, त्या क्षेत्रात इस्त्रायली हवाई हल्ल्यात मुलांसहित कमीत कमी २१० पॅलेस्टिनी मारले गेले होते. या दाव्याचे खंडन इस्त्रायली सैन्याने केलं. हमासच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या उत्तरादाखल इस्त्रायलने दाट लोकसंख्या असणाऱ्या गाझा पट्टीवर जोरदार हवाई बॉम्बफेक केले आणि तेवहापासून युद्ध सुरु आहे.

अधिक वाचा-

लढाऊ विमाने उडत होती..महिला-मुले रस्त्यांवरून पळत होती…

एका छाप्यात अनेक पॅलेस्टिनींची हत्या करून यास इस्त्राएलने एक आश्चर्यकारक यश म्हणून साजरे केले. प्रत्यक्षदर्शी मोहम्मद अल-हबाशने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, "इस्रायली बॉम्बस्फोट हा 'नरक' होता. आम्ही या ठिकाणी अनेक लढाऊ विमाने उडताना पाहिली. आम्ही लोक रस्त्यावर पळताना पाहिले. महिला आणि मुले ओरडत होती आणि रडत होती."

युद्धाशी संबंधित निर्वासित शिबिरातील नुसेरातमध्ये हे ऑपरेशन, ७ ऑक्टोबरनंतरचे सर्वात मोठे बचाव अभियान होते. जेव्हा हमास आणि इतर अतिरेकींनी सीमेपलीकडे घुसून सुमारे १,२०० लोकांची हत्या केली, ज्यात बहुतेक नागरिक होते आणि २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते.

अधिक वाचा-

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या मोठ्या हल्ल्यात ३६ हजार ७०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. छाप्यात ६४ मुले आणि ५७ महिलांचा मृत्यू झाला आणि जवळपास ७०० जखमी झाले. यामध्ये १५३ मुले आणि १६१ महिलांचा समावेश आहे.

Israeli War Cabinet Minister Benny Gantz
Israeli War Cabinet Minister Benny Gantz

इस्त्रायल वॉरचे कॅबिनेट मंत्री बेनी गैंट्ज यांनी दिला राजीनामा

इस्त्रायल वॉरचे कॅबिनेट मंत्री बेनी गैंट्ज यांनी राजीनामा दिला असून पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती केली. याच्या उत्तरादाखल बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी एक स्टेटमेंट जारी करून म्हटले की, इस्रायल अनेक आघाड्यांवर अस्तित्वासाठी लढत आहे. बेनी, ही पळून जाण्याची वेळ नाही. राजीनामा देण्याआधी गैंट्ज यांनी मे महिन्यात मागणी केली होती की, नेतन्याहू यांनी गाझासाठी एक स्पष्ट रणनीती बनवावी, आणि युद्धविराम करारासाठी सहमत दर्शवावी.

अधिक वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news