इस्रायलच्‍या पर्यटकांवर मालदीव घालणार बंदी! गाझा युद्धामुळे निर्णय

इस्रायलच्‍या पर्यटकांवर मालदीव घालणार बंदी! गाझा युद्धामुळे निर्णय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मालदीव सरकार लवकरच इस्रायलमधील पर्यटकांवर बंदी घालण्‍याचा निर्णय  घेणार आहे. इस्‍त्रायलने गाझामधील युद्ध सुरु ठेवल्‍याने बहुसंख्य मुस्लिम राष्ट्रामध्ये जनक्षोभ वाढला आहे. यातूनच हा निर्णय घेतला असल्‍याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे.
मालदीव राष्ट्रपतींच्या कार्यालयाने रविवारी (दि. २ जून) स्‍पष्‍ट केले की, मंत्रिमंडळाने इस्रायली पासपोर्ट धारकांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कायदे बदलण्याचा विचार करत आहे. तसेव यावर देखरेख ठेवण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी इस्रायली पासपोर्ट धारकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, याबाबत नवीन कायदा करण्‍यासाठी समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. "मालदीवियन्स इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन" या राष्ट्रीय निधी उभारणी मोहिमेचीही घोषणा करण्‍यात आली आहे.

मालदीवने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला इस्रायली पर्यटकांवरील पूर्वीची बंदी उठवली होती. आता गाझा युद्धाचा निषेध म्हणून मालदीवमधील विरोधी पक्ष आणि सरकारी सहयोगी इस्त्रायलींवर बंदी घालण्यासाठी मुइझूवर दबाव आणत आहेत.अधिकृत आकडेवारीनुसार मालदीवला भेट देणाऱ्या इस्रायलींची संख्या या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 528 पर्यंत घसरली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षी या कालावधीच्या तुलनेत तब्‍बल 88 टक्क्यांनी कमी आहे.

इस्रायलवर 7 ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दहशतवादी हल्‍ला केला. यानंतर गाझा युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्‍या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत किमान 36,439 लोक मारले गेले आहेत, असे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मालदीव प्रवास टाळ्‍याचा इस्त्रायलचा नागरिकांना सल्‍ला

इस्रायलच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नागरिकांना मालदीवचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ओरेन मार्मोर्स्टीन यांनी म्‍हटलं आहे की, परराष्ट्र मंत्रालयाने शिफारस केली आहे की, इस्त्रायलमधील नागरिकांनी मालदीवमध्ये परदेशी पासपोर्ट असलेल्या आणि सध्या तेथे पर्यटनासाठी जाण्याचा विचार करणाऱ्यांनी  प्रवास टाळावा. गेल्या वर्षी सुमारे 11,000 इस्रायलींनी मालदीवला भेट दिली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news