Israel Hamas War : इस्रायलने युद्ध थांबवल्यास हमास करार करण्यास तयार 

Israel Hamas War : इस्रायलने युद्ध थांबवल्यास हमास करार करण्यास तयार 

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान हमासने तडजोडीचा प्रस्ताव दिला आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलने "गाझामधील लोकांवरील युद्ध आणि आक्रमण थांबवल्यास" ते "संपूर्ण करार" करण्यासाठी तयार आहेत. Israel Hamas War

  • गाझा युद्ध थांबवल्यास हमास इस्रायलशी 'संपूर्ण करार' करण्यास तयार
  • इस्त्रायली रणगाडे मंगळवारी (दि.२८) रफाहमध्ये घुसले होते
  • रविवारी (दि. २६) राफाह हल्ल्यात ३५ हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले

संपूर्ण करार करण्यासाठी तयार…

हमासन सांगितले की, आमच्या लोकांविरुद्ध सुरू असलेली आक्रमकता, घेराव, उपासमार आणि नरसंहार यादरम्यान युद्धविराम चर्चा होऊ शकत नाही. जर इस्रायलने गाझामधील लोकांविरुद्धचे युद्ध थांबवले तर ते ओलिसांच्या देवाणघेवाणीच्या करारासह "संपूर्ण करार करण्यास तयार आहेत". रॉयटर्स या वृत्तसंस्थेने  दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, इस्रायलने "गाझामधील लोकांवरील युद्ध आणि आक्रमण थांबवल्यास" ते "संपूर्ण करार" करण्यासाठी तयार आहेत. Israel Hamas War

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ (International Court of Justice) )  आदेशानंतरही इस्रायलने दक्षिण गाझा शहर रफाहवर आक्रमण सुरू ठेवल्याचे हमासचे म्हणणे आहे. पुढे असेही म्हटलं आहे की, "आज, आम्ही मध्यस्थांना आमच्या स्पष्ट भूमिकेची माहिती दिली, जर गाझामधील आमच्या लोकांविरूद्ध युद्ध आणि आक्रमण थांबवले, तर आमची तयारी एका संपूर्ण करारापर्यंत पोहोचण्यासाठी आहे. ज्यामध्ये सर्वसमावेशक विनिमय कराराचा समावेश आहे,". इस्त्रायलने मंगळवारी (दि.२८) म्हटले होते की, गाझामधील हमासवरील त्यांचे युद्ध वर्षभर सुरू राहील.

पॅलेस्टिनी आरोग्य आणि नागरी आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२६) दक्षिण गाझा पट्टी शहरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात राफाहमध्ये ३५ हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. रफाहमध्ये शेकडो विस्थापित पॅलेस्टिनी राहतात ज्यांनी गेल्या वर्षी हमासच्या  ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या विरोधात इस्रायलने प्रतिआक्रमण सुरू केल्यापासून गाझाच्या उत्तरेकडील भागातून पळ काढला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news