Israel Iran Conflict: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयावर इराणचा हल्ला; संघर्ष आणखी वाढणार

Israel Iran Conflict: इराणच्या IRGC ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. घटनेनंतर इस्रायल-इराण संघर्ष अधिक तीव्र झाला असून अणुस्थळांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
Israel Iran Conflict
Israel Iran Conflict Pudhari
Published on
Updated on

Israel Iran Conflict Netanyahu Office Attack: पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. सोमवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नेतान्याहू यांच्या कार्यालयासह इस्रायली हवाई दल प्रमुखांच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचे IRGC ने आपल्या अधिकृत टेलिग्राम मेसेजमध्ये म्हटले आहे. या हल्ल्यानंतर नेतान्याहू यांच्या स्थितीबाबत स्पष्ट माहिती नाही, असा दावा देखील करण्यात आला आहे.

Israel Iran Conflict
Iran Stability Analysis: इराणमध्ये शोक, संताप अन्‌‍ जल्लोष!

IRGC ने काय दावा केला?

IRGC च्या निवेदनानुसार, “खैबर शेकन” या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. इस्रायलच्या पंतप्रधानांचे कार्यालय आणि हवाई दल प्रमुखांचे ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, इस्रायलने अद्याप या दाव्याची अधिकृत माहिती दिली नाही.

संघर्ष का वाढला?

अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्त कारवाई करत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यावर हल्ला केला. त्या कारवाईनंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायलमधील शहरांवर तसेच गल्फ परिसरातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.

Israel Iran Conflict
Iran Conflict Impact: इराण संघर्ष लांबल्यास अमेरिकन अर्थव्यवस्थेला फटका; तेल दरवाढीचा थेट परिणाम नागरिकांवर

अणुस्थळांबाबत चिंता

दरम्यान, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी संभाव्य रेडिओलॉजिकल गळतीबाबत इशारा दिला आहे. इराणचे IAEA मधील राजदूत रझा नजाफी यांनी नतान्झ अणुऊर्जा केंद्रावर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केल्याचा दावा केला आहे.

या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक अस्थिर झाली आहे. आंतरराष्ट्रीय संघटना शांततेचे आवाहन करत असल्या तरी प्रतिहल्ल्यांची मालिका सुरूच राहिल्यास संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून अधिकृत माहिती आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news