Iran Conflict Impact: इराण संघर्ष लांबल्यास अमेरिकन अर्थव्यवस्थेला फटका; तेल दरवाढीचा थेट परिणाम नागरिकांवर

ब्रेंट क्रूड 80-100 डॉलरच्या उंबरठ्यावर? होर्मूझ सामुद्रधुनी, वॉल स्ट्रीट आणि महागाईवर वाढती चिंता
Donald Trump
Donald Trump File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन डी सी : अनिल टाकळकर

इराण हल्ल्याचा संघर्ष लांबला तर अमेरिकन नागरिकांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी अमेरिकन नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा त्यांच्या प्रशासनाचा प्रयत्न दिसतो. पण हा अंदाज फसण्याची दाट शक्यता आहे.

Donald Trump
CIA Iran Strike Operation: सीआयएच्या ‘टीप’वरून इराणवर अचूक हल्ला; खामेनी ठार, अमेरिका-इस्रायलची संयुक्त कारवाई

या संघर्षाचे परिणाम हा संघर्ष किती काळ चालतो आणि किती व्यापक स्वरूप धारण करतो, यावर अवलंबून असतील. याचा मोठा परिणाम म्हणजे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता. त्याच बरोबर वाहतुकीतील अडथळ्यांमुळे इतर वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अपेक्षित वेगवान वाढीवरही पाणी फिरू शकेल.

Donald Trump
World War Risk 2026: हुकूमशाही वृत्तीमुळे जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर!

तेलाच्या किमती कळीचा मुद्दा

तेलाच्या किमती हा सर्वांत तातडीचा आणि कळीचा मुद्दा आहे. जागतिक निकष मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती गेल्या महिन्यात 12 टक्क्यांहून अधिक वाढून प्रति बॅरल 73 डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत. शनिवारी झालेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हल्ल्याचा धोका व्यापाऱ्यांनी आधीच गृहीत धरला होता.

विश्लेषकांच्या मते, अगदी अल्पकालीन युद्ध झाले तरी तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात आणि अमेरिकेत पेट्रोलचे दर वाढू शकतात. इराण तसेच त्याच्या शेजारील देश - सौदी अरेबिया, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याकडून तेलपुरवठा खंडित झाला, तर किमती थेट शंभर डॉलरच्या पुढे जाऊ शकतात. जगातील सागरी तेल वाहतुकीपैकी सुमारे एक पंचमांश वाहतूक इराणच्या किनाऱ्यालगत असलेल्या होर्मूझच्या सामुद्रधुनीमधून होते. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने हल्ले सुरू झाल्यानंतर लगेचच ही सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा केला आहे.

Donald Trump
Iran Stability Analysis: इराणमध्ये शोक, संताप अन्‌‍ जल्लोष!

शेअर बाजारालाही हादरा

इराणप्रकरणी संघर्ष दीर्घकाळ चालला तर वॉल स्ट्रीटला तो हादरवू शकतो. मंगळवारी झालेल्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात ट्रम्प यांनी ज्या गुंतवणूक नफ्यांबाबत अभिमान व्यक्त केला होता, त्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

अमेरिकेतील शेअर बाजार सध्या कंपन्यांच्या नफ्याच्या तुलनेत ऐतिहासिकदृष्ट्या उच्च पातळीवर आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कंपन्यांचे शेअर वरच्या पातळीवर आहेत. मात्र संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे अलीकडच्या सत्रांत बाजारात चढ-उतार दिसून आले. आशियाई बाजार रविवारी रात्री उघडताच मोठ्या प्रमाणावर विक्री होण्याची शक्यता अनेक गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत.

अचानक पेट्रोलचे दर वाढलेले असतील आणि 401(के) निवृत्ती गुंतवणुकीची किंमत घसरलेली असेल, असे लंडनस्थित कॅपिटल इकॉनॉमिक्सचे मुख्य जागतिक अर्थतज्ज्ञ नील शियरिंग म्हणाले.

Donald Trump
Tomahawk vs Shahab Missiles: विध्वंसक टॉमहॉक विरुद्ध शहाब; विनाशक शस्त्रांचा मारा

जागतिक मालवाहतुकीवर परिणाम

या संघर्षामुळे जागतिक कंटेनर शिपिंगवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्शियन गल्फ प्रदेशात तसेच इतर ठिकाणीही अनेक ग्राहक व औद्योगिक वस्तू महाग होऊ शकतात.

पहिल्या अमेरिकन हल्ल्यानंतर काही तासांतच जगातील आघाडीच्या मालवाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या हॅपग लॉईडने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी सर्व वाहतूक तात्पुरती थांबवत असल्याची घोषणा केली. हॅम्बुर्गस्थित अल्फालायनरचे शिपिंग विलेषक जान टिडेमन यांच्या मते, बहुतांश प्रमुख मालवाहतूक कंपन्या हापाग लॉयडच्या पावलावर पाऊल ठेवतील.

लाल समुद्रातून सुएझ कालव्याकडे जाणारी वाहतूक नुकतीच पुन्हा सुरू करणाऱ्या काही कंपन्याही परिस्थिती स्थिर होईपर्यंत ती बंद ठेवण्याची शक्यता आहे. येमेनमधील इराणसमर्थित हूथी गट बाब एल-मंदेब सामुद्रधुनीत पुन्हा हल्ले सुरू करू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

Donald Trump
Iran Airstrike: अणू कार्यक्रम, आंदोलने आणि ‘कमाल दबाव’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये 40 दिवसांचा शोक; जागतिक राजकारणात नवे वळण

महागाईविषयी मतदारांची चिंता

असा परिणाम झाला, तर मतदारांच्या महागाई आणि दैनंदिन जीवन खर्चाविषयीच्या चिंतेवर उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाला करणे अधिक कठीण होईल. ट्रम्प यांनी जीवन खर्च कमी झाल्याचा दावा केला असला, तरी या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेल्या वॉशिंग्टन पोस्ट एबीसी न्यूज इप्सोस सर्वेक्षणानुसार 65 टक्के अमेरिकन नागरिक महागाई हाताळण्यात त्यांच्या दाव्याला नकारात्मक प्रतिसाद देतांना आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news