Iran Airstrike: अणू कार्यक्रम, आंदोलने आणि ‘कमाल दबाव’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये 40 दिवसांचा शोक; जागतिक राजकारणात नवे वळण

मध्यपूर्वेतील समीकरणे बदलणार?
 Khamenei
Khamenei Pudhari
Published on
Updated on

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे वयाच्या 86व्या वर्षी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात निधन झाले. देशांतर्गत कठोर दडपशाही आणि मध्यपूर्वेतील इतर देशांच्या सत्तासमीकरणांवर प्रभाव टाकण्याच्या धोरणामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली.

 Khamenei
Global Flight Cancellations: मध्यपूर्वेतील युद्धाचा जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम; हजारो उड्डाणे रद्द

जून 2025 मध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणूसंपन्नता कार्यक्रमावर बॉम्बहल्ले केले; मात्र तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. अर्थव्यवस्था खालावत गेली आणि पुढील जानेवारीत इस्लामिक प्रजासत्ताकाविरुद्ध देशभर आंदोलन उसळले. सुमारे 30,000 हून अधिक आंदोलक ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आधुनिक इराणच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जीवितहानी मानली जाते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणू कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र उत्पादनाबाबत चर्चा संथ असल्याचे सांगत नव्या हल्ल्याची घोषणा केली आणि इराणी जनतेला सरकार ताब्यात घेण्याचे आवाहन केले.

 Khamenei
Global Flight Cancellations: मध्यपूर्वेतील युद्धाचा जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम; हजारो उड्डाणे रद्द

1989 मध्ये अयातुल्लाह रुहोल्लाह खामेनी यांच्या निधनानंतर 88 सदस्यीय तज्ज्ञ मंडळाने खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड केली. त्यानंतर इराणच्या अणू कार्यक्रमापासून ते पाश्चिमात्य देशांशी संबंधांपर्यंत अंतिम निर्णय त्यांचाच असे.

ते इराणी सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर होते, ज्यात नियमित लष्कर (आर्तेश) आणि इस्लामिक रिव्होशनरी गार्डस्‌‍ कॉप्स यांचा समावेश होता. तसेच त्यांनी ‌‘ॲक्सिस ऑफ रेसिस्टन्स‌’ या इस्रायलविरोधी आघाडीचे नेतृत्व केले, ज्यात लेबनॉनमधील हिजबुल्लाह, गाझामधील हमास आणि इतर शिया संघटनांचा समावेश होता.

 Khamenei
Ayatollah Ali Khamenei Death: इस्रायल जास्त काळ टिकणार नाही; खामेनी यांचा शुक्रवारी तेहरानच्या मशिदीत अखेरचा संदेश

ट्रम्प यांचा दबाव

हसन रुहानी यांच्या काळात 2015 मध्ये संयुक्त व्यापक कृती आराखडा करार झाला; मात्र 2018 मध्ये ट्रम्प प्रशासनाने त्यातून माघार घेत ‌‘कमाल दबाव‌’ धोरण अवलंबले.

2022 मध्ये महसा जिना अमिनी यांच्या मृत्यूनंतर ‌‘वुमन, लाइफ, फ्रिडम‌’ आंदोलन उसळले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अटक, मृत्यू आणि दडपशाही झाली. 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात मानवतेविरुद्ध गुन्हे झाल्याचे नमूद झाले. जून 2025 मध्ये इस्रायलच्या अचानक हल्ल्याने ‌‘12 दिवसांचे युद्ध‌’ भडकले. अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यांमुळे इराणच्या अणुस्थळांचे मोठे नुकसान झाले. डिसेंबरमध्ये चलन कोसळल्याने पुन्हा देशव्यापी आंदोलन उसळले आणि जानेवारी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात हत्याकांड घडल्याची नोंद झाली.

 Khamenei
Afghanistan Air Strike Pakistan: पाकिस्तानच्या वर्मी घाव... नूर खान बेस ते रावळपिंडी; अफगाणिस्तानचा जबर एअर स्ट्राईक

1939 मध्ये मशहद येथे जन्मलेले खामेनी साध्या कुटुंबातून पुढे आले. 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर ते प्रभावी नेते बनले. 1981 मध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, ज्यात त्यांचा उजवा हात निकामी झाला. 1981-89 दरम्यान ते राष्ट्राध्यक्ष होते. 1965 मध्ये त्यांनी मन्सुरेह खोजस्तेह बाघेरजादेह यांच्याशी विवाह केला. त्यांना सहा मुले आहेत.

 Khamenei
US-Israel Attack Iran: इराणसोबतचे युद्ध किती दिवस सुरू राहणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे 'महायुद्धा'वर मोठे विधान

आंतरराष्ट्रीय निर्बंध

राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खातामी (1997-2005) यांच्या सुधारक कारकिर्दीत अमेरिकेशी संबंधात काहीसा मोकळेपणा आला; पण 1999 मधील विद्यार्थी आंदोलन चिरडण्यात आले. महंमौद अहमदीनेजाद (2005-13) यांच्या काळात अणू कार्यक्रम पुन्हा वेगाने सुरू झाला आणि कडक आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले. 2009 मधील वादग्रस्त निवडणुकीनंतर ‌‘ग्रीन मूव्हमेंट‌’ आंदोलन उसळले, ज्याला खामेनी यांनी पाश्चिमात्य पाठबळ असलेली ‌‘व्हेल्वेट क्रांती‌’ म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news