Mojtaba Khamenei : "सर्व शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार" ; इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी घेतली शपथ

टेलिग्राम अकाउंटवर संदेशात जारी करुन मांडली भूमिका
Iran Supreme Leader Mojtaba Khamenei
Iran Supreme Leader Mojtaba Khamenei Pudhari
Published on
Updated on

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांनी शनिवारी, फेब्रुवारीमध्ये इस्रायल-अमेरिका हल्ल्यात मारले गेलेले त्यांचे वडील आणि तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. आपल्या दिवंगत नेत्याचा आणि वडिलांचा बदला घेणे ही देशाची मागणी असून तो घेतलाच पाहिजे, असे मोजतबा यांनी म्हटले आहे.

टेलिग्राम अकाउंटवर जारी केला संदेश

टेलिग्राम अकाउंटवर जारी केलेल्या एका लेखी संदेशात त्‍यांनी ही भूमिका मांडली. आपल्या वडिलांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने त्यांनी हा संदेश दिला. यात त्यांनी म्हटले आहे की, "आम्ही शहीद नेते आणि या दोन्ही युद्धांतील सर्व शहीदांच्या रक्ताचा बदला त्या गुन्हेगार आणि कुप्रसिद्ध मारेकऱ्यांकडून घेण्याचे वचन देतो."

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei
Ayatollah Ali Khamenei Funeral | खामेनींच्या अंत्यविधीवेळी १४ महिन्यांच्या नातीची शवपेटी पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले

'हॉर्मुजची सामुद्रधुनी'वर नियंत्रणासाठी इराणचे प्रयत्‍न

खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येची उघड मागणी करण्यात आल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला होता. ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे की, 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली असून या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर कोणतेही हल्ले केले जाणार नाहीत, असे जाहीर पत्रक इराणने काढावे. मात्र, तेहरानने (इराण सरकार) अद्याप असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही, उलट या मार्गावर आपलेच नियंत्रण राहील यावर त्यांनी भर दिला आहे.

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei
Ali Khamenei Funeral Date : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनींवर तब्बल १३२ दिवसांनी होणार अंत्यसंस्कार!

अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ले सुरु

अमेरिका गेल्या काही दिवसांपासून इराणला लक्ष्य करत पुन्हा एकदा हवाई हल्ले करत आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने पश्चिम आशियातील अनेक देशांवर हल्ले केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला हॉर्मुजमध्ये इराणने तीन जहाजांवर केलेल्या हल्ल्यानंतर हे हवाई हल्ले सुरू झाले. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले की, "आमची एक हजार क्षेपणास्त्रे तयार असून त्यांचे लक्ष्य इराण आहे. जर इराण सरकारने त्यांच्या धमकीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यानंतर लगेचच आणखी हजारो क्षेपणास्त्रे डागली जातील."

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei
Ayatollah Ali Khamenei Funeral : मन:पूर्वक आभार! खामेनींच्‍या अंत्यसंस्काराला भारताच्या उपस्थितीबद्दल इराणने व्यक्त केले आभार

'इराणचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त करू' - ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, अमेरिकन सैन्य इराणचा संपूर्ण परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त आणि नष्ट करेल - अल्लाहचे आभार! युद्ध आणि त्यानंतर लागू झालेल्या तात्पुरत्या युद्धबंदीदरम्यान ट्रम्प यांनी अनेकदा अरबी भाषेत देवाचे (अल्लाहचे) नाव घेतले आहे. त्यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकीही दिली आहे. यावर, अमेरिकेतील 'काउन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स' या देशव्यापी हक्क संघटनेने ट्रम्प यांच्यावर इस्लामची चुकीच्या पद्धतीने थट्टा उडवल्याचा आरोप करत त्यांच्यावर तीव्र टीका केली होती.

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei
Donald Trump : "कोणीच शिल्लक राहणार नाही..." : इराणला इशारा देताना राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार

अमेरिका आणि इस्‍त्रायलच्‍या हवाई हल्‍ल्‍यात ठार झालेले इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे पार्थिक गुरुवारी उशिरा रात्री मशहद शहरातील 'इमाम रझा दर्गा' येथे दफन करण्यात आले. इराणची वृत्तसंस्था 'इर्ना' (IRNA) ने दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा खामेनी यांचे मोठे सुपुत्र हुज्जतुलइस्लाम सय्यद मुस्तफा हुसैनी खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी जनाजाची नमाज अदा केली. यासोबतच इराण आणि शेजारील देश इराकच्या पाच शहरांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेली शोकयात्रा झाली. मंगळवारी इराणच्या मध्यवर्ती कोम शहरात अंत्यसंस्काराचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी इराकच्या नजफ आणि कर्बला शहरात शोकसभा पार पडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news