Strait of Hormuz : इराणचा भारताला मोठा दिलासा; 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'तून भारतीय जहाजांना हिरवा कंदील!

काही निवडक देशांसोबतचे आर्थिक संबंध दृढ करण्‍यासाठी घेतला निर्णय
Strait of Hormuz Reopens
प्रतिकात्‍मक छायाचित्र. Pudhari
Published on: 
Updated on: 

Iran Strait of Hormuz Indian Ships Permission : इराणने भारत, चीन, इराक आणि कतारच्या जहाजांना या सामुद्रधुनीतून जाण्यावरील निर्बंधांतून सवलत दिली आहे. "आम्ही सध्या भारत, चीन, इराक आणि कतारला होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक निर्बंधांतून सवलत दिली आहे. या देशांची जहाजे मुक्तपणे ये-जा करू शकतात आणि अमेरिकनही त्यांना अडवत नाहीत," अशी माहिती इराणच्या संसदेच्या 'राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समिती'चे उपाध्यक्ष अमीर हयात मोकद्दम यांनी 'इराणीयन स्टुडंट्स न्यूज एजन्सी'ला दिलेल्या मुलाखतीवेळी दिली.

काही निवडक देशांसोबतचे आर्थिक संबंध दृढ करण्‍यासाठी घेतला निर्णय

इराण काही निवडक देशांसोबतचे आर्थिक आणि राजनैतिक संबंध दृढ करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील प्रवेशाचा वापर एक साधन म्हणून करत आहे. मात्र अन्‍य जहाजांवर निर्बंध कायम आहेत.

Strait of Hormuz Reopens
Strait Of Hormuz Video: होर्मुजमध्ये तरंगणाऱ्या iPhone साठी झुंबड... छोट्या नावेतून महागडे परफ्युमही केले गोळा

भारताला निर्बंधातून सवलत देण्‍याचे कारण काय?

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, भारताकडे औषध निर्मितीचे मोठे क्षेत्र आहे. भारत औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांचा एक महत्त्वाचा संभाव्य पुरवठादार ठरू शकतो. भारतीय जहाजांना सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देऊन इराण भारताकडून आवश्यक असलेल्या मालाची आयात सुलभ करू शकते. तर चीन बाबतचा निर्णय हा राजकीय स्वरूपाचा असल्याचे दिसते. मोकद्दम यांनी सांगितले की, ही सवलत चीनचा पाठिंबा मिळवण्यासाठी देण्यात आली आहे. विशेषतः व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात चीन हा इराणचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. वॉशिंग्टन आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या दबावाचा सामना करत असताना, चीनचा राजनैतिक पाठिंबा इराणसाठी अत्यंत मोलाचा ठरतो, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Strait of Hormuz Reopens
Who is Strait owner of Hormuz : 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'चा खरा मालक कोण? अमेरिका आणि इराणच्या दाव्यांमुळे जागतिक तेल पुरवठा संकटात

भारतासाठी 'होर्मुझची सामुद्रधुनी' का महत्त्वाची आहे?

होर्मुझची सामुद्रधुनी ही इराण आणि ओमान यांच्या दरम्यानचा एक अरुंद जलमार्ग आहे. हा जलमार्ग पर्शियन आखाताला ओमानचे आखात आणि अरबी समुद्राशी जोडतो. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. आखाती देशांमधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी हा एक प्रमुख मार्ग आहे. भारतासाठी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (होर्मुझची सामुद्रधुनी) ही ऊर्जेची एक अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या, द्रवीभूत पेट्रोलियम वायूच्या (LPG) आणि द्रवीभूत नैसर्गिक वायूच्या (LNG) आयातीचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो.

४५ टक्‍के कच्‍चे तेल, ९० टक्‍के LPG आयात याच मार्गाने

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी अमेरिका आणि इराण संघर्ष सुरू होण्यापूर्वी, भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ४५ टक्के आणि LPG आयातीपैकी जवळपास ९० टक्के साठा याच जलमार्गावरून येत असे. भारत LNG पुरवठ्यासाठीही मोठ्या प्रमाणावर या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे; आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) अंदाजानुसार, २०२५ मध्ये भारताच्या एकूण LNG आयातीपैकी सुमारे दोन-तृतीयांश साठा याच मार्गावरून आला होता. यामध्ये प्रामुख्याने कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून होणाऱ्या आयातीचा समावेश होता.

Strait of Hormuz Reopens
Mahadev Betting App : महादेव ॲपचा 'मास्टरमाइंड' भारताच्या ताब्यात; कसा चालायचा ६ हजार कोटींच्या 'बेटिंग'चा खेळ?

भारताच्‍या सागरी व्‍यापाराला मिळणार मोठा दिलासा

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्‍ला केला.. यानंतर संपूर्ण प्रदेशात मोठा संघर्ष पेटला. एप्रिल महिन्यात युद्धविराम झाला होता; परंतु संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरल्याने जुलै महिन्यात अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्‍हा संघर्ष सुरु झाला. आता होर्मुझची सामुद्रधुनी तणाव कायम असताना इराणने जहाजांना निर्बंधांतून वगळण्याचा घेतलेला निर्णय भारतासह चार देशांना मोठा दिलासा देणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.