

Strait Of Hormuz Video: स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये युएईच्या ताब्यातील भागात एक कार्गो जहाज बुडाल्यामुळं समुद्रात आयफोन आणि महागड्या परफ्युमचे नवे कोरे बॉक्स तरंगू लागले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओत छोट्या नावेतून हा सगळा माल एकत्र केला जात असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिंगापूरचा झेंडा असलेला एक कंटेनर जीएफएस प्राईड बुधवारी समुद्री सुरूंगाच्या विस्फोटामुळे अचानक बुडाले. जहाजात आग लागल्याची देखील माहिती समोर येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जहाजावर असलेल्या सर्व २१ क्रू मेंबर्सना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. सुरूंगाच्या स्फोटात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
सांगितल्या प्रमाणे हे जहाज दुबईतून जवळपास २५०० कंटेनर घेऊन जात होता. यात आयफोन आणि महागडे परफ्युम यांचा समावेश होता. इराणच्या आआरजीसीने देवा केला आहे की हे जहात समुद्री सुरूंगाच्या वरून जात होते त्यावेळी सुरूंगाचा स्फोट झाला.
होर्मुजमध्ये जहाज बुडण्याची घटना घडली आहे. सध्याच्या घडीला स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये तणाव वाढला आहे. या मार्गे जगातील कच्चे तेल आणि गॅसची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.
यापूर्वी २३ सप्टेंबरला एँटीगुआ आणि बारबुडा यांचे झेंडे असलेल्या मालवाहू जहाज केप दाओ देखील होर्मुजमध्ये प्रोजेक्टाईलच्या हल्ल्यात बुडाले होते. यातवेळी एका क्रू मेंबरचे निधन झाले होते. बाकी लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
इराणने अमेरिकेने आपल्या बंदरांची केलेली नाकेबंदी आणि गेल्या महिन्यात लादलेले कडक निर्बंध याचे प्रत्युत्तर म्हणून ते हल्ला करत आहेत. २८ फेब्रिवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणने होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता.