Indra Nooyi Controversy: भारत घाणेरडा... तिथं असते तरी कधीही पेप्सिकोची CEO बनली नसते; इंदिरा नूयी यांचे वादग्रस्त वक्तव्य

Indra Nooyi Controversy
Indra Nooyi Controversypudhari
Published on
Updated on

Indra Nooyi Controversy: पेप्सिकोच्या माजी CEO इंदिरा नूयी यांनी भारताबाबत एक आक्षेपार्ह वक्तव केलं आहे. मूभ भारतीय वंशांच्या असणाऱ्या नूयी यांनी एका मुलाखतीत चीन आणि भारत यांची तुलना देखील केली. त्यांनी चीनची भलामण करताना भारताच्या संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका केली आहे. इंदिरा नूयी यांनी हूवर इस्टिट्युशनच्या एका खास मुलाखतीत लीडरशिप, अमेरिका आणि आपला प्रवास याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.

Indra Nooyi Controversy
PM Narendra Modi | नरेंद्र मोदी युगाची वैशिष्ट्ये

अमेरिकेचे गुणगान

नूयी यांनी अमेरिकेच्या मेरिटोक्रेटिक म्हणजे योग्यतेच्या आधारावर असलेल्या व्यवस्थेचे गुणगाण केलं आहे. त्यांनी जर त्या अमेरिकेत आल्या नसत्या तर त्यांना या उंचीवर पोहचता आलं नसतं. भारतातील सामाजिक आणि कॉर्पोरेट व्यवस्थेवर टीका करताना इंदिरा नूयी म्हणतात की मला जेवढं यश मिळालं ते भारतात राहून कदाचित मिळालं नसतं.

त्या म्हणाल्या, 'एक अप्रवासी भारतीय आपल्या खिशात काही न घेता येते एका प्रतिष्ठित कंपनीची सीईओ बनते. असं जगातील कोणत्याही दुसऱ्या देशात होऊ शकत नाही. जगात अनेक देश आहेत. एवढंच काय मी भारतात देखील सीईओ बनू शकले नसते.

Indra Nooyi Controversy
PM Narendra Modi | तप विश्वास, विकास आणि जनसहभागाचे!

भारतात अव्यवस्था

एक प्रवासी म्हणून चीन आणि भारताची तुलना करत नूयी म्हणतात, चीन खूप व्यवस्थित आहे. भारतात पूर्णपणे केओस माजलेला असतो. त्या म्हणाल्या, चीनमध्ये चांगले लोक आणि संस्कृती आहे. भारताच्या तुलनेत चीनमध्ये वेळ घालवणं सहज शक्य आहे. जर तुम्हाला स्वच्छ आणि व्यवस्थित आयुष्य जगायला आवडतं तर हे असं जगणं भारतात शक्य नाही. भारताचे सौंदर्यच अव्यवस्थेत आहे. जर तुम्हाला ही अव्यवस्था आवडते तर तुम्ही तिथं सारखं सारखं जाल. भारताला जाणून घेणं सोपं नाही मात्र भारतीय लोक या अव्यवस्थेतूनही आपापला मार्ग काढत असतात.

Indra Nooyi Controversy
PM Modi France visit | १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांतून घडतोय नवा भारत : पंतप्रधान मोदी

६० ते ७० च्या दशकातील महिलांची भारतातील स्थिती

नूयी यांनी आपल्या सुरूवातीच्या आयुष्याबाबत बोलताना सांगितलं की, ६० आणि ७० च्या दशकात भारत हा नवा देश होता. तिथं महिला समाजाची काही मोठी ताकद नव्हती. जास्तीकरून महिला या घरातच रहात होत्या. मात्र स्वतःचं उदाहरण देताना माझ्या वडील आणि आजोबांनी मला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि जग जिंकण्याची स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित केलं. त्यामुळं मी अमेरिकेत जाण्याचे धाडस केलं.

Indra Nooyi Controversy
Eknath Shinde | हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकीच; शिंदे यांचा घणाघात

चीन अन् भारताची तुलना

नूयी यांनी चीनची केंद्रीय विकास मॉडेल आणि भारतीय लोकशाही यांची तुलना करताना चीनने केंद्रीय व्यवस्था अंमलात आणत लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आणि एक सुपरपॉवर झाले.

मात्र भारत अजूनही जागतिक शक्ती होण्यासाठी धडपडत आहे. लोकशाही आणि प्रत्येकाकडे असलेला मताचा अधिकार, आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो त्यावेळी विकासाची गती कमी होतेच.

logo
Pudhari News
pudhari.news