India Economy Growth | भारत 2027 पर्यंत जापानला मागे टाकून बनणार जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

India Economy Growth | आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालातील अंदाज
India Economy Growth
India Economy Growth
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आएमएफ) ताज्या अहवालानुसार, भारत २०२७ पर्यंत जापानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असून या अहवालात भारत आणि जापान यांच्या आर्थिक वाटचालीतील फरक ठळकपणे स्पष्ट करण्यात आला आहे.
आएमएफच्या अहवालानुसार चालू वर्ष संपेपर्यंत जापान सकल देशांतर्गत उत्पादनात चौथ्या क्रमांकावर कायम राहील.

India Economy Growth
Goa Water Scarcity | पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी गोवा सरकारतर्फे विशेष कृती दल स्थापन

तथापि, २०२७ मध्ये भारत जापानची जागा घेईल. त्यावेळी भारताचा जीडीपी ४.५२ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. २०२७ मध्ये जापान घसरून सहाव्या क्रमांकावर येईल आणि भारत व युनायटेड किंगडम हे दोन्ही देश पुढील क्रमांकावर जातील.

जागतिक आर्थिक आव्हाने असूनही भारताने गेल्या काही वर्षात मजबूत वाढ दाखवली आहे. याउलट, जापानला लोकसंख्येचे वाढते वय आणि इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे तेथील आर्थिक वाढ मंदावली आहे. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, त्यानंतर चीन आणि जर्मनीचा क्रमांक लागते.

India Economy Growth
Goa Women Cricket Player | सत्तरीच्या ग्रामीण भागातून थेट गोवा क्रिकेट संघापर्यंत झेप घेणाऱ्या सुंदा यत्रेकर यांची प्रेरणादायी गाथा

जापानचा विकास दर मंदावणार
जापानचा विकास दर चालू वर्षात ०.७ टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे जापानला मोठा फटका बसला आहे. यास्तव 'बँक ऑफ जापान'ला व्याज दरात गेल्या तीन दशकांतील सर्वात मोठी वाढ करावी लागली याकडे आएमएफचे आशिया विभागाचे संचालक श्रीनिवासन यांनी लक्ष वेधले आहे.

भारताची भक्कम स्थिती
आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा प्रादेशिक आर्थिक अहवाल जारी करताना आएमएफचे आशिया विभागाचे संचालक कृष्ण श्रीनिवासन यांनी महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे वाढलेल्या इंधनाच्या कीमतोंचा झटका बसण्यापूर्वीची भारताची आर्थिक स्थिती भक्कम होती. विकास दर उत्तम होता आणि राजकोषीय शिस्त पाळली जात होती. त्यामुळे इंधनासह जागतिक आर्थिक संकटाला भारताने धैर्याने तोंड दिले, असे श्रीनिवासन म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news