Goa Water Scarcity | पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी गोवा सरकारतर्फे विशेष कृती दल स्थापन

Goa Water Scarcity | सरकार दक्ष : गरजेनुसार जलतरण तलावांवरही बंदीची शक्यता
Nanded Water Scarcity
Nanded Water Scarcitypudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्याला उष्णतेचे चटके आताच जाणवू लागले आहेत. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल एवढा जलसाठा असल्याची ग्वाही दिली असली तरी, गरज पडल्यास जलतरण तलावांवावर बंदीसह इतर उपाययोजना हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे. पाणी उपलब्धतेबाबत दैनंदिन देखरेखीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदलही स्थापन केले आहे.

Nanded Water Scarcity
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

त्याच वेळी राज्यातील वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी वाढल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. त्यासाठी पुढील दोन महिने अधिक दराने वाढीव वीज खरेदी करण्यात येणार आहे. सध्या ५० मेगावाट वीज खरेदी केली असून, आणखी ३० मेगावाट वीज खरेदी करावी लागेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने पाणीटंचाईसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दलाची स्थापना केली आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

बदलते हवामान, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि कच्च्या व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न यामुळे गोव्याच्या डोक्यावर जलसंकटाची ताڭती तलवार निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे.

पाण्याची उपलब्धता आणि आगामी काळातील गरजा यांचा विचार करून आवश्यक उपाययोजनांवर कृती दलाच्या बैठकीत चर्चा झाली. पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती गंभीर बनल्यास गोव्यातील जलतरण तलावांवरही बंदी घालण्याचा पर्याय सरकारसमोर आहे.

राज्यातील जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आणि पाणी संवर्धनासाठी उपाययोजनांवर यावर चर्चा करण्यात आली, असे शिरोडकर यांनी सांगितले. जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, गोव्यात सध्या कच्च्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पाऊस पडला नाही, तरी ऑगस्ट २०२७ पर्यंत राज्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी सरकारकडून नियोजन करण्यात आले आहे.

मे २०२७ पर्यंत पाणी देणार : फळदेसाई

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याबाबतची परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र, मे २०२७ पर्यंत सर्वांना पाणी देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत. बहुतेकजण कच्च्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यासाठी दिलेले पाणी बागेसाठी, जलतरण तलावासाठी आणि गाड्या धुण्यासाठी वापरतात.

त्यासाठीवापरू नये. आम्ही खाणीतील पाणी प्रक्रिया करून वापरणावर विचार करीत आहोत. पूर्वीचे पाण्याचे न वापरातील स्रोत सध्या कोणत्या स्थितीत आहेत, ते अभियंत्यांना पाहायला लावून त्या पाणवठ्यांची साफसफाई करून ते पाणी वापरात येणार आहोत, असे पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

Nanded Water Scarcity
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

अतिरिक्त वीज खरेदीचा भार

अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्याचवेळी देशातील कोळसा पुरवठ्यावर परिणाम होऊन कोळसा उत्पादनात सुमारे १० ते १२ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सध्या अतिरिक्त ५० मेगावॅट विजेची खरेदी गोव्याने केली असून, आणखी ३० मेगावॅटची गरज लागणार आहे. त्यामुळे या महिन्यात विजेचे दर १२.३० ते १२.५० रु. प्रति युनिट असतील, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

वाढलेला उकाडा, तसेच पुरवठा केलेला कोळसा ओला असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम वीजपुरवठ्यावर झाला आहे. हवामानात बदल हे त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कमी झालेला पाऊस, तसेच देशातील काही भागांत झालेल्या पर्जन्यमानातील बदलांचा वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे.

त्यामुळे मागणी आणि उपलब्ध वीज यांच्यात तफावत निर्माण होऊन, अतिरिक्त वीज खरेदी करावी लागत आहे, असे ते म्हणाले. वीजटंचाई भरून काढण्यासाठी यापूर्वीची उपलब्ध असलेली ५० मेगावॅट अतिरिक्त विजेऐवजी आणखी ३० मेगावॅट वीज घेण्यात येत आहे. या महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या अतिरिक्त ३० मेगावॅट विजेसाठी प्रति युनिट सुमारे १२ रुपये २० पैसे ते १२ रुपये ५० पैसे इतका दर मोजावा लागला. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. पुढील महिन्यासाठीही अतिरिक्त ३० मेगावॅट वीज घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति युनिट सुमारे ८ रुपये ५० पैसे खर्च अपेक्षित आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news