

Sheikh Hasina Death Sentence Interpol India Bangladesh News: बांग्लादेशातील इंटरनॅशनल कोर्टाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवते विरुद्ध केलेल्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या दोन निकटवर्तीयांवर माजी गृहमंत्री असदुज्जामान खान कमाल आणि माजी पोलीस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांनाही मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. शेख हसीना सध्या भारतात आश्रय घेत असल्याने, न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार याबद्दल चर्चा सुरू आहे.
कोर्टाने 453 पानी निर्णयात म्हटले आहे की जुलै 2023च्या विद्रोहादरम्यान निहत्थ्या नागरिकांवर पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या गोळीबारास थेट शेख हसीना जबाबदार आहेत.
न्यायालयाने त्यांच्यावर मानवतेविरुद्ध गुन्हे, सत्तेचा गैरवापर आणि विरोधकांचे दमन केल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.
निर्णयात असेही सांगितले आहे की, जानेवारी 2024च्या निवडणुकीनंतर हसीना हुकूमशाहीकडे झुकल्या, विरोधी पक्षावर कठोर कारवाई केली आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
सत्ता गेल्यानंतर शेख हसीना भारतात आल्या आणि सध्या त्या भारतातचं आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी बांग्लादेश सरकार भारताच्या सहकार्यावर पूर्णपणे अवलंबून आहे.
बांग्लादेश सरकार
इंटरपोलकडे अटक वॉरंट पाठवेल
इंटरपोल रेड कॉर्नर नोटिस जारी करू शकते
इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणा असून, सदस्य देशांना परस्पर सहकार्यातून गुन्हेगारांचा शोध घेण्यात मदत करते. एकदा रेड कॉर्नर नोटिस जारी झाल्यानंतर भारताला अधिकृतरीत्या माहिती दिली जाईल, कारण हसीना सध्या भारतात आहेत.
हसीना भारतात असल्याने पुढील सर्व निर्णय भारताच्या भूमिकेवर अवलंबून आहेत.
भारताने सहकार्य केल्यास हसीना यांना ताब्यात घेऊन बांग्लादेशमध्ये पाठवण्यात येईल.
मात्र भारताने हा निर्णय नाकारल्यास, बांग्लादेश हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे (UN) नेऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतो.
या निर्णयामुळे बांग्लादेशात राजकीय तणाव वाढण्याची, तसेच भारत–बांग्लादेश संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेख हसीनांच्या अटकेचा प्रश्न आता कायदा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांच्याशी थेट जोडला गेला आहे.