

US attack Iran US General Dan Caine press conference
नवी दिल्ली : शनिवारी 21 जून रोजी अमेरिकेने इराणच्या तीन अणुउत्पन्न केंद्रांवर घडवून आणलेल्या प्रचंड हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असे गुप्तनाव देण्यात आले होते. हा हल्ला अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण करण्यात आले आणि इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला कोणतीही प्रतिक्रिया देण्याची संधीही मिळाली नाही, असे अमेरिकेचे जनरल डॅन केन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या हल्ल्यामध्ये इराणमधील प्रमुख तीन लक्ष्ये- फोर्डो (Fordow), नतान्झ (Natanz) आणि इस्फहान (Isfahan) येथील इराणची अणुउत्पन्न स्थळे उद्धवस्त करण्यात आली.
यात अमेरिकेच्या 7 B-2 स्टेल्थ बॉम्बर्स विमाने ज्यात प्रत्येकी दोन सैनिक होते सामिल झाले. 14 'बंकर बस्टर' बॉम्ब्स (Massive Ordnance Penetrators) ज्यातील प्रत्येकाचे वजन 30000 पौंड आहे असे बॉम्ब, 2 डझनहून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रे, एकूण 125 पेक्षा अधिक सैनिकी विमानांची तुकडी यांच्या सहाय्याने हा हल्ला केला गेला.
रात्री 12 - अमेरिका खंडातील बेसवरून बॉम्बर्स विमानांचे उड्डाण
सायं. 5 - एका अमेरिकन पाणबुडीवरून इस्फहानवर टॉमहॉक क्षेपणास्त्र डागले
सायं. 6.40- फोर्डोवर पहिला 'बंकर बस्टर' बॉम्ब टाकला.
सायं. 6.40 ते 7.05 - नतान्झ आणि इस्फहानवर येथील हल्ले पूर्ण केले.
सायं. 7.05- सर्व विमाने इराणी हवाई क्षेत्रातून बाहेर पडली. इराणकडून एकही प्रतिहल्ला झाला नाही.
जनरल डॅन केन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, पॅसिफिक महासागराच्या दिशेने एक ‘डिकॉय’ तुकडी पाठवून अमेरिकेने इराणला भ्रमित केले. ही युक्ती अत्यंत कमी अधिकाऱ्यांना माहीत होती, ज्यामुळे इराणचा रडार मूळ हल्ला ओळखू शकला नाही.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचे मत
पीट हेगसेथ यांनी अमेरिकेच्या कारवाईला “भव्य यश” म्हटले असून, इराणची अणुउत्पन्न क्षमता “पूर्णपणे उद्ध्वस्त” झाली असल्याचा दावा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवस आधीच निर्णय घेऊन या हल्ल्याला परवानगी दिली. ते वॉशिंग्टनमधील 'सिच्युएशन रूम' मधून ऑपरेशनचे निरीक्षण करत होते.
याआधी इस्रायलने 13 जूनपासूनच इराणवर हल्ले सुरू केले होते, ज्यात त्यांच्या विमानतळ, क्षेपणास्त्र अड्ड्यांवर निशाणा साधला गेला होता.
प्रभाव आणि मृत्यूसंख्या
इराणमध्ये मृत्यू – किमान 430 (इराणी आरोग्य मंत्रालयानुसार)
जखमी – सुमारे 3500
इस्रायलमध्ये मृत्यू – 24 नागरिक
जखमी – 1272