

US-Iran Bunker Buster Bomb
तेहरान/वॉशिंग्टन : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या गुप्त अणुशक्ती प्रकल्पांवर थेट हल्ला चढवत जगाचे लक्ष वेधले आहे. अत्यंत उच्च-प्रभावी GBU-57 Massive Ordnance Penetrator (MOP) ‘बंकर बस्टर’ बॉम्बचा वापर करून अमेरिकेने इराणच्या फार्दो, नाटांझ आणि इस्फाहान (Fordow, Natanz, Isfahan) या अणु केंद्रांना लक्ष्य केलं.
हा बॉम्ब इतका शक्तिशाली आहे की तो जमिनीखाली 60 मीटरपर्यंत प्रवेश करून स्फोट करू शकतो आणि याच शक्तीचा वापर करत अमेरिकेने Fordow केंद्र पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला आहे. या कारवाईमुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष नव्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या अणुशक्ती केंद्रांवर अभूतपूर्व हवाई हल्ला केला आहे. Fordow, Natanz आणि Isfahan या अणु केंद्रांवर एकूण 12 GBU-57 Massive Ordnance Penetrator (MOP) बॉम्ब आणि 30 Tomahawk क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.
अमेरिकेच्या या कारवाईत Fordow केंद्र पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. Natanz वर 2 बॉम्ब इतर 30 Tomahawk मिसाइल्स Natanz आणि Isfahan येथे लॉंच करण्यात आले. हे बॉम्ब युद्धात पहिल्यांदा वापरले गेले आहेत, असे नोंदवले गेले .
GBU‑57A/B, ज्याला Massive Ordnance Penetrator (MOP) म्हणून ओळखले जाते, हे अमेरिकेचे सर्वात मोठे, नॉन–न्यूक्लियर पारंपरिक “bunker‑buster” बॉम्ब आहे.
हे GPS-गाइडेड असून, खोलवर असलेली संरचना तोडण्यासाठी खास डिझाइन केलेले आहे
याचे वजन तब्बल 13,600 किलो (30,000 पाउंड) आहे
लांबी 20.5 f आणि व्यास सुमारे 31.5 इंच
हा बॉम्ब 60 मीटर खोल भूगर्भात प्रवेश करून स्फोट घडवतो.
ताकद: 6,000 lb (2.4 ट्न) उच्चस्फोटक वहन क्षमता जी 60 मीटर खोल जमिनीत किंवा 18 मीटर जाडीच्या काँक्रीटमध्ये प्रवेश करून विस्फोट करू शकतो
या बॉम्बचे 2013 पर्यंत कमीत कमी 20 युनिट्स निर्मित; 2025 मध्यापर्यंत सुधारित आणि अपडेटेड व्हेरिएंट्स तयार केले गेले होते.
हे बॉम्ब फक्त B-2 Spirit या स्टेल्थ बॉम्बर्समध्येच बसवले जाऊ शकतात. अमेरिकेने 6 B-2 विमानांमधून 12 MOP बॉम्ब Fordow वर टाकले, तर Tomahawk क्षेपणास्त्रांचा वापर Natanz आणि Isfahan केंद्रांवर करण्यात आला. Northrop B‑2 Spirit ही एकमेव विमाने आहेत जी हे 30,000 lb ‘bunker‑buster’ बॉम्ब घेऊ शकतात
इराणच्या Fordow सारख्या आण्विक सुविधा केंद्रे 50 ते 100 मीटर खोलवर असल्यामुळे फक्त GBU‑57 सारखा बॉम्बच ती उद्धवस्त करू शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला “spectacular military success” असे संबोधले आणि सांगितले की “Fordow केंद्र पूर्णतः नष्ट झाले आहे.इराण शांततेचा मार्ग स्वीकारत नसेल, तर अजून मोठी कारवाई होऊ शकते, असेही ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्यावर “गंभीर चिंता” व्यक्त केली असून, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. तज्ञांच्या मते हा हल्ला मध्य-पूर्वेतील आणखी एक युद्ध भडकवू शकतो.