

US Airstrike Iran
तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढताना दिसत असून, इराणने अमेरिकेला गंभीर परिणामांची चेतावणी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायली लष्कराच्या संयुक्त हल्ल्यात इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला झाल्यानंतर इराणने अमेरिकन सैन्य आणि नागरिक हे आता "थेट लक्ष्य" असल्याचे जाहीर केले आहे.
इराणच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील अणुउद्योगांवर अमेरिकेच्या हवाई दलाने रविवारी सकाळी हल्ले केले.
या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निकटवर्तीय व कठोर विचारसरणीच्या 'कायहान' वृत्तपत्राचे संपादक हुसेन शरियतमदारी यांनी अमेरिकेच्या नौदल तळांवर हल्ल्याची आणि होर्मूझ सामुद्रधुनीत अमेरिकन व युरोपीय जहाजांना अडवण्याची मागणी केली आहे.
इराणच्या संभाव्य प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे मध्यपूर्वेतील काही महत्त्वाचे सैनिकी तळ इराणचे संभाव्य लक्ष्य बनू शकतात. सध्या अमेरिकेचे 40000 हून अधिक सैनिक CENTCOM (U.S. Central Command) अंतर्गत या भागात तैनात आहेत. जाणून घेऊया मध्यपुर्वेत कोणत्या ठिकाणी अमेरिकेचे महत्त्वाचे तळ आहेत.
अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याचे (फिफ्थ फ्लीट) मुख्यालय आणि U.S. Naval Forces Central Command येथे स्थित आहे.
येथे अमेरिकेच्या अणुवाहक जहाजांसह मोठ्या नौदल जहाजांसाठी खोल पाण्याचे बंदर आहे.
चार अँटी-माईन जहाजे, दोन लॉजिस्टिक जहाजे आणि कोस्ट गार्डची तैनाती आहे.
अमेरिका 1948 पासून हा तळ वापरात आहे.
येथील अल उदीद एअर बेस हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठे एअर बेस आहे.
येथे CENTCOM चे मुख्यालय आहे. विशेष सैनिकी दल आणि 379 व्या हवाई विंगची तैनाती येथे आहे.
या तळावर विविध लढाऊ विमाने तैनात असून ती फिरती राहतात.
येथील अल असद एअर बेस (अल-अनबार प्रांत) आणि अल हरीर एअर बेस (एर्बिल) हे दोन अमेरिकेचे प्रमुख तळ आहेत.
2020 मध्ये जनरल कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर इराणने अल असद तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता.
अंदाजे 2500 अमेरिकन सैनिक येथे दहशतवादविरोधी लढ्यांत कार्यरत आहेत.
येथील अल तनफ गॅरिसन तळ सीरिया, इराक व जॉर्डनच्या सीमेजवळ स्थित आहे.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरुद्धच्या लढ्यासाठी अमेरिकेची येथे दीर्घकालीन तैनाती आहे.
हा तळ अनेक वेळा इराणसमर्थित गटांच्या हल्ल्यांचा बळी ठरलेला आहे.
येथील अली अल-सालेम एअर बेस हा इराकी सीमेजवळ असून 386 व्या हवाई विंगचे केंद्र आहे.
कॅम्प अरिफजान – CENTCOM च्या लष्करी घटकाचे आघाडीचे मुख्यालय येथे आहे.
येथे लष्करी साठवणूक केंद्रही आहे.
येथील अल धाफ्रा एअर बेस, येथे 380व्या हवाई विंगचे मुख्यालय आहे.
अमेरिकेची एफ-22 रॅप्टर जेट, MQ-9 ड्रोन आणि गुप्तचर विमाने या तळावर कार्यरत आहेत.
येथील गल्फ एअर वॉरफेअर सेंटरमध्ये हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते.