Abu Dhabi Air Taxi | अबूधाबीच्या आकाशात पहिल्या स्वयंचलित एअर टॅक्सीचे यशस्वी चाचणी उड्डाण; पाहा व्हिडिओ

Abu Dhabi Air Taxi | 2026 पासून सामान्यांसाठी व्यावसायिक सेवा सुरू होणार
Abu Dhabi Air Taxi
Abu Dhabi Air Taxi Pudhari
Published on
Updated on

Abu Dhabi Flying Taxi Driverless Electric Air Taxi Archer Aviation UAE Midnight eVTOL

अबूधाबी : अबूधाबीने शहर वाहतुकीत क्रांती घडविणाऱ्या पहिल्या ड्रायव्हरलेस (स्वयंचलित) इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या यशस्वी चाचणी उड्डाणाची घोषणा केली आहे. 2026 च्या सुरुवातीस ही सेवा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकास्थित Archer Aviation या कंपनीने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली असून, अबूधाबी हे त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण स्थळ ठरणार आहे.

उड्डाणाची वैशिष्ट्ये आणि ठिकाण

या एअर टॅक्सीचे चाचणी उड्डाण अबूधाबीतील अल बतीन एक्झिक्युटिव्ह एअरपोर्ट येथे पार पडले. चाचणीदरम्यान Midnight eVTOL (Electric Vertical Take-Off and Landing) हे पूर्णपणे विजेवर चालणारे आणि शून्य प्रदूषण करणारे विमान शहराच्या आकाशात उडताना दिसले.

Abu Dhabi Air Taxi
Mars Rock Auction | मंगळ ग्रहावरुन आलेल्या जगातील सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव; 'इतक्या' कोटींना विकणार...

खराब हवामानात चाचणी

Gulf News च्या अहवालानुसार, या चाचण्या विशेषतः युएईतील उष्ण हवामान, जास्त आर्द्रता आणि धूळ यासारख्या परिस्थितींमध्ये पार पडणार आहेत.

ही टॅक्सी विशेषतः शहरांतील अल्प पल्ल्याच्या प्रवासासाठी म्हणजे विमानतळ ते शहराचे केंद्र अशी वाहतूक सोपी करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.

केवळ श्रीमंतांसाठी नाही तर सामान्यांसाठी सेवा

Khaleej Times ने स्पष्ट केले आहे की ही सेवा केवळ श्रीमंत किंवा लक्झरी प्रवाशांसाठी नाही, तर सामान्य जनतेसाठीही किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात एअर टॅक्सी ही सामान्य शहरवासीयांसाठीही एक व्यवहार्य पर्याय ठरू शकते.

Abu Dhabi Air Taxi
Japan volcano eruption 2025 | जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक! रिओ तात्सुकी यांच्या 'त्या' भविष्यवाणीने भीतीचे वातावरण

वाहतुकीतील क्रांती व संभाव्य उपयोग

ही टॅक्सी रस्त्यांवरील गर्दी कमी करेल, प्रवासाचा कालावधी घटवेल आणि पारंपरिक वाहनांपेक्षा अधिक शांत व पर्यावरणपूरक असेल. याशिवाय, भविष्यात अशा eVTOLsचा वापर शोध व बचाव मोहीमांमध्ये करण्याची शक्यता आहे.

दुर्गम भागात, जसे की वाडी नकाब किंवा जेबेल जैस येथे पारंपरिक हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाहीत, तेथे ही टॅक्सी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

Abu Dhabi Air Taxi
Shehbaz Sharif | पाक पंतप्रधानांच्या उलट्या बोंबा; म्हणे- पहलगाम हल्ला दुर्दैवी! पण त्याचा वापर करून भारताने प्रादेशिक शांतता भंग केली...

दुबईतही चाचणी यशस्वी

अबूधाबीच्या या यशापूर्वी दुबईमध्ये Joby Aviation या कंपनीने ३० जून रोजी अशाच प्रकारच्या एअर टॅक्सीचे यशस्वी चाचणी उड्डाण केले होते. दोन्ही सेवा २०२६च्या सुरुवातीला व्यावसायिक स्वरूपात सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news